#SAvIND: कोण जिंकणार आज पहिला वनडे सामना?

डर्बन। दक्षिण आफ्रिका विरुद्ध भारत संघात ६ सामन्यांची वनडे मालिका होणार असून आज आजपासून या मालिकेला सुरुवात होणार आहे. किंग्समेड, डर्बन येथे हा पहिला सामना रंगेल. या सामन्यात भारताला विजय मिळाल्यास आयसीसीच्या वनडे क्रमवारीत अव्वल येण्याची संधी आहे.

सध्या भारतीय संघ दुसऱ्या क्रमांकावर आहे. तर दक्षिण आफ्रिका प्रथम स्थानावर विराजमान आहे. या दोन संघांच्या गुणांमध्ये फक्त १ गुणाचा फरक आहे.

या मालिकेआधी या दोन्ही संघात ३ सामन्यांची कसोटी मालिका पार पडली होती. या मालिकेत दक्षिण आफ्रिकेने २-१ असा विजय मिळवला होता. तसेच या मालिकेत दोन्ही संघाचे गोलंदाज चमकले होते. मात्र फलंदाजांनी खराब कामगिरी केली होती. या संपूर्ण मालिकेत फक्त एकच शतक झळकावले गेले होते. ते भारतीय कर्णधार विराट कोहलीने हे शतक केले होते.

आजपासून सुरु होणाऱ्या वनडे मालिकेत भारतीय संघात थोडा बदल झाला आहे. एमएस धोनी, अक्षर पटेल, युजवेंद्र चहल हे खेळाडू या वनडे मालिकेसाठी भारतीय संघात दाखल झालेले आहेत.

याबरोबरच दक्षिण आफ्रिकेला मात्र मोठा झटका बसला आहे. त्यांचा आक्रमक फलंदाज एबी डिव्हिलियर्स बोटाच्या दुखापतीमुळे पहिल्या ३ वनडे सामन्यातून बाहेर पडला आहे.

भारताने दक्षिण आफ्रिकेत खेळताना आजपर्यंत २८ सामन्यात ५ वेळा विजय मिळवला आहे. तर २ सामन्यांचा निकाल लागलेला नाही आणि २१ सामन्यात पराभव स्वीकारला आहे.