दक्षिण आफ्रिकेने नाणेफेक जिंकून घेतला क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय 

केपटाउन। दक्षिण आफ्रिका विरुद्ध भारत संघात आज तिसरा वनडे सामना होणार आहे. या सामन्यात दक्षिण आफ्रिकेने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला आहे. 

भारतीय संघ ६ सामन्यांच्या वनडे मालिकेत २-० असा आघाडीवर आहे. त्यामुळे त्यांना हा सामना जिंकून दक्षिण आफ्रिकेत सलग तिसरा सामना जिंकण्याचा विक्रम करण्याची संधी आहे. याआधी भारतीय संघाने १९९२-९३ आणि २०१०-११ मध्ये सलग दोन वनडे सामने जिंकले होते. मात्र त्यानंतर त्यांना पराभव मिळाला होता. त्यामुळे हा इतिहास पुसण्याची भारताला चांगली संधी आहे. 

असा आहे भारतीय संघ: रोहित शर्मा (उपकर्णधार), शिखर धवन, विराट कोहली (कर्णधार), अजिंक्य रहाणे, एमएस धोनी, केदार जाधव, हार्दिक पंड्या, कुलदीप यादव, भुवनेश्वर कुमार, जसप्रीत बुमराह, युझवेन्द्र चहल