दुसरी कसोटी: अखेर दक्षिण आफ्रिकेने चारली ऑस्ट्रेलियाला ६ विकेटने धूळ

0 201

माजी कर्णधार एबी डी विलीयर्सची पहिल्या डावातील शतकी खेळी आणि वेगवान गोलंदाज कागीसो रबाडाची अफलातून गोलंदाजीच्या जोरावर दक्षिण आफ्रिकेने ऑस्ट्रेलियाला ६ विकेटने मात दिली. 

दुसऱ्या कसोटी सामन्याच्या चौथ्या दिवशी आज ५ बाद १८० पूढे खेळायला सुरूवात करणाऱ्या ऑस्ट्रेलियाचा दुसरा डाव २३९ धावांत संपूष्टात आला. ऑस्ट्रेलियाकडून दूसऱ्या डावात उस्मान ख्नाजाने ७५ तर मीचेल मार्शने ४५ धावा केल्या. 

यामुळे १०१ धावांच लक्ष घेवून मैदानात अालेल्या दक्षिण आफ्रिकेने हे लक्ष २२.५ षटकांत पार करताना ४ बाद १०२ धावा केल्या. यात एबी डी विलीयर्सने २८, हशीम आमलाने २७, एडेन मारक्रमने २१ धावा केल्या. 

सध्या वादाच्या भोवऱ्यात असणाऱ्या परंतु जबरदस्त कामगिरी करत सामन्यात ११ विकट घेणाऱ्या कागीसो रबाडाला सामनावीर घोषीत करण्यात आले. 

मालिकेतील तिसरी कसोटी सामना केप टाउन येथे गुरूवार,२२मार्च पासून सुरू होणार आहे. 

Comments
Loading...
%d bloggers like this: