हा २२ वर्षीय खेळाडू गाजवतोय जागतिक क्रिकेट

कागिसो रबाडा हा आफ्रिकेचा वेगवान गोलंदाज रोज नवनवीन विक्रम करत आहे. कालच आयसीसीने जाहीर केलेल्या कसोटी क्रमवारीत हा खेळाडू तिसऱ्या क्रमांकावर पोहचला आहे.

१० जुलै २०१५ रोजी बांगलादेश विरुद्ध वनडे पदार्पणात या खेळाडूने चक्क ६ विकेट्स घेतल्या होत्या. ८ षटकांत १६ धावा देत त्याने ही कामगिरी केली होती. पदार्पणात कोणत्याही गोलंदाजाने केलेली ही सर्वोच्च कामगिरी आहे.

विशेष म्हणजे त्याने पदार्पणातच हॅट्रिक विकेट्स घेतल्या होत्या. वनडे कारकिर्दीतील केवळ दुसरे शतक टाकताना त्याने शेवटच्या ३ चेंडूवर त्याने ही कामगिरी केली होती.

हा खेळाडू आजपर्यंत आफ्रिकेकडून २० कसोटी सामने खेळला आहे ज्यात त्याने २२.७१च्या सरासरीने १०२ विकेट्स घेतल्या आहेत तर ४० वनडेत ६५ विकेट्स घेतल्या आहेत. १६ टी२० सामने खेळताना २२ खेळाडूंना तंबूचा रस्ता दाखवला आहे.

१९९५ साली जन्म झालेला रबाडा केवळ २२ वर्ष आणि १४० दिवसांचा आहे. जर त्याने हाच फॉर्म कायम ठेवला तर जागतिक क्रिकेटमधील एक दिग्गज गोलंदाज म्हणून तो नक्की ओळख निर्माण करेल.