अनुष्कानंतर आणखी एक अभिनेत्री या क्रिकेटरच्या प्रेमात क्लीन बोल्ड!

क्रिकेट आणि चित्रपटसृष्टी यांच्यात एक खास नाते नेहेमीच राहिले आहे. अनेक क्रिकेटपटूंनी अभिनेत्रींनशी विवाह देखील केला आहे. भारतीय कर्णधार विराट कोहली आणि बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्मा यांचे नुकतेच झालेले लग्न याचे उदाहरण आहे.

याबरोबरच भारताचा अष्टपैलू खेळाडू युवराज सिंगनेही हेझल कीच या अभिनेत्रीशी विवाह केला आहे. आता साऊथ इंडियन चित्रपटसृष्टीतील अभिनेत्री राशी खन्नाने ती भारताचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहवर प्रेम करते असे सांगितले आहे.

त्याचबरोबर तिने हेही सांगितले की ती बुमराहासाठीच क्रिकेट बघते. तिला क्रिकेट पाहायला आवडते.याबद्दलचे वृत्त अमर उजालाने दिले आहे. 

राशीने जिल, हायपर, शिवम, सन ऑफ सत्यमूर्थी-२ या चित्रपटांमध्ये काम केले आहे. तसेच तिने बॉलिवूडमध्ये मद्रास कॅफे या चित्रपटात जॉन अब्राहाम बरोबरही काम केले आहे.

बुमराहने अजून तरी यावर काही प्रतिक्रिया दिलेली नाही. त्यामुळे आता तो राशीला काय उत्तर देतो याची सर्वांना उत्सुकता असेल.