जीएसटीवरून हरभजन सिंग सरकारबद्दल काय म्हणाला?

भारताचा महान फिरकी गोलंदाज हरभजन सिंगने जीएसटीवरून सरकारवर ताशेरे ओढले आहेत. केंद्र सरकार आणि राज्य सरकारला भराव्या लागणाऱ्या जीएसटीवरून त्याने ट्विटरच्या माध्यमातून हा हल्लाबोल केला आहे.

“रात्री हॉटेलमध्ये जेवण केल्यावर जेव्हा बिल भरायची वेळ येते तेव्हा राज्य आणि केंद्रसरकार हे दोघेही आपल्याबरोबर जेवण करण्यासाठी होते असे वाटते. “ असे हरभजन सिंग आपल्या ट्विटमध्ये म्हणतो.

हरभजनचा ट्विट: While making payment of bill after dinner in restaurant, it feels like state govt & central govt both had a dinner with us…

 

हरभजन सिंग सध्या भारतीय संघाबाहेर असून या खेळाडूने भारताकडून १०३ कसोटी आणि २३० वनडे सामने खेळले आहेत. कसोटीत ४१७ तर वनडेत २६९ विकेट्स हरभजनने घेतल्या आहेत.