कुठे गेला तुमचा कोहली?

भारत-इंग्लंड यांच्यात एजबस्टन क्रिकेट मैदानावर झालेल्या पहिल्या कसोटी सामन्यात फलंदाजांच्या निराशाजनक कामगिरीमुळे भारतीय संघाने विजयाची संधी गमावली होती.

या सामन्यात कर्णधार विराट कोहली वगळता एकाही भारतीय फलंदाजाला इंग्लिश गोलंदाजांचा सामना करता आला नाही.

सामन्याच्या दोन्ही डावात एकट्या कोहलीने इंग्लिश गोलंदाजांचा धैर्याने सामना केला होता.

पहिल्या डावात १४९ तर दुसऱ्या डावात ५१ धावा करत दोन्ही डावात भारताकडून उच्चांकी धावसंख्या विराट कोहलीचीच होती.

याचाच आधार घेत इंग्लिश चाहत्यांनी भारतीय संघाची एजबस्टन मैदानावरुन हॉटेलमध्ये परतताना “व्हेअर इज युवर कोहली गॉन?” असे म्हणत खिल्ली उडवली.

त्यापूर्वी या व्हिडिओमध्ये भारतीय आणि इंग्लिश चाहत्यांमध्येही जुगलबंदी पहायला मिळाली.

भारत-इंग्लंड यांच्यातील पाच सामन्याच्या कोसोटी मालिकेतील दुसऱ्या सामन्याला ९ ऑगस्टपासून लॉर्ड्स क्रिकेट मैदानावर सुरवात होत आहे.

क्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडी, बातम्या, सदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअॅपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअॅप क्रमांकावर Join Maha असा मेसेज नक्की करा.

महत्त्वाच्या बातम्या:

-दुसऱ्या कसोटीसाठी इंग्लंड संघातून स्टार खेळाडूला वगळले

-श्रीलंकन युवा संघ पुन्हा एकदा पडला टीम इंडियाला भारी