भारतीय गोलंदाज म्हणतो मी इंग्लंडमध्ये आनंद लुटायला आलोय

बर्मिंगहॅम। भारताला एजबस्टन मैदानावर पार पडलेल्या इंग्लंड विरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात इंग्लंडकडून लाजीरवाणा पराभव स्विकारावा लागला.

या सामन्यात भारताकडून कर्णधार विराट कोहली वगळता एकाही फलंदाजाला धावा करता आल्या नाहीत.

या सामन्यात भारताला इंग्लंडकडून ३१ धावांनी पराभव स्विकारावा लागला.

यामध्ये भारतीय गोलंदाजांनी टिच्चून मारा करत विजयाचा घास तोंडापर्यंत आणला होता. मात्र भारताच्या फलंदाजांनी मोक्याच्या क्षणी विकेट टाकल्यामुळे इंग्लंडने भारताकडून विजयाचा घास हिरावून घेतला.

असे असले तरी या सामन्यात चमकदार कामगिरी करणाऱ्या फिरकीपटू आर अश्विनने फलंदाजांची बाजू घेत त्याचा बचाव केला आहे.

“एजबस्टन मैदानावरील खेळपट्टी फलंदाजीसाठी अवघड होती. इंग्लडच्या पहिल्या डावात जो रुट आणि जॉनी बेअस्ट्रो तर भारताच्या पहिल्या डावात विराट वगळता एकही फलंदाज खेळपट्टीवर तग धरु शकला नाही. त्यामुळे मला वाटते की आमच्या फलंदाजांना थोडासा वेळ द्यायला हवा.” असे अश्विन पत्रकारांशी बोलताना म्हणाला.

तसेच पुढे अश्विनने या सामन्यात त्याने केलेल्या चमकदार कामगिरी विषयीसुद्धा भाष्य केले.

“मी इंग्लंड दौऱ्यावर येताना इथे कसोटी सामन्यांचा आनंद घायचा असे ठरवून आलो होतो. मी गेल्या काही दिवसांपासून प्रसार माध्यमात माझ्याविषयी काय चर्चा होतात हे पहाण्याचे आणि वाचण्याचे टाळले आहे. माझ्याकडे ५९ कसोटी सामन्यांचा अनुभव आहे. तो इंग्लंड विरुद्धच्या उर्वरित मालिकेत पणाला लावत भारताला विजयी करण्याचा प्रयत्न करणार आहे.” असे आर अश्विन म्हणाला.

इंग्लंड विरुद्धच्या एडजबेस्टन मैदानावर झालेल्या पहिल्या सामन्यात भारत ३१ धावांनी पराभूत झाला.

या सामन्यात आर अश्विनने पहिल्या डावात ४ तर दुसऱ्या डावात ३ विकेट मिळवल्या होत्या.

क्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडी, बातम्या, सदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअॅपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअॅप क्रमांकावर Join Maha असा मेसेज नक्की करा.

महत्त्वाच्या बातम्या:

-वर्ल्ड बॅडमिंटन चॅम्पियनशीप: पीव्ही सिंधूला सलग दुसऱ्यांदा रौप्यपदक!

-प्रो-कबड्डी लीगच्या ५ व्या मोसमापूर्वी दबंग दिल्लीने केली मोठी घोषणा