विराट कोहलीचे शिखर धवन, ऋषभ पंत आणि देशवासीयांना अनोखे चॅलेंज

भारत-इंग्लंड यांच्यातील लॉर्ड्स येथे  सुरु होणाऱ्या दुसऱ्या कसोटी सामन्यापूर्वी विराट कोहलीने, या वेळच्या स्वतंत्र दिनाचे औचित्य साधून सलामीवीर शिखर धवन, ऋषभ पंत आणि देशवासियांना इंस्टाग्रामच्या माध्यमातून वेशभूषा चॅलेंज दिले आहे.

बुधवारी (८ ऑगस्ट) विराट कोहलीने इंस्टाग्रामवर एक व्हिडिओ शेअर केला आहे.

यामध्ये विराटने शिखर धवन, ऋषभ पंत आणि देशवासीयांनी यावेळचा स्वतंत्र दिन पारंपरिक पोशाख कुर्ता आणि पायजमा घालून साजरा करत भारतीय संस्कृती जपण्याचे अवाहन केले आहे.

“यावेळचा स्वतंत्र दिन सर्व भारतीय नागरीकांनी आपली पारंपरिक वेशभूषा परिधान करुन साजरा करावा. आपली पारंपारिक वेशभूषा सर्व भारतीयांना एकत्र आणण्याचे एक माध्यम आहे. सर्वांनी यावेळी वेशभूषा हॅशटॅग वापरत आपले फोटो सोशल मिडियावर शेअर करावे. यासाठी मी शिखर आणि ऋषभला नॉमिनेट करतो.” असे विराट आपल्या इंस्टाग्राम पोस्टमध्ये म्हणाला.

भारत आणि इंग्लंड यांच्यात गुरवारपासून (९ ऑगस्ट) लॉर्ड्स क्रिकेट मैदानावर दुसरा कसोटी सामना सुरु होणार आहे.

भारताचा कर्णधार विराट कोहली कामयच सोशल मिडियावर सक्रिय असतो. त्याने यापूर्वीही सोशल मिडियाच्या माध्यमातून भारताचे क्रीडा मंत्री राज्यवर्धन सिंग राठोड यांनी दिलेले फिटनेस चॅलेंज पूर्ण केले होते.

क्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडी, बातम्या, सदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअॅपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअॅप क्रमांकावर Join Maha असा मेसेज नक्की करा.

महत्त्वाच्या बातम्या:

टाॅप ३- या भारतीय खेळाडूंचा २०१९चा विश्वचषक ठरणार शेवटचा!

सचिनच्या निवृत्तीच्या भाषणानंतर भावुक झाले होते करुणानिधी