यामुळे दिग्गज अष्टपैलू क्रिकेटपटू करणार पाकिस्तान क्रिकेट मंडळा विरुद्ध बंड!

पाकिस्तान क्रिकेट मंडळाने नुकतेच येत्या तीन वर्षासाठी 33 खेळाडूंना करारबद्ध केले आहे.

गेल्या वर्षी बी श्रेणीमध्ये असलेल्या बाबर आझमला यावेळी ए श्रेणीत स्थान देण्यात आले आहे. तर पाकिस्तान संघाचा वरिष्ठ खेळाडू मोहम्मद हफीजची ए श्रेणीतून बी श्रेणीत घसरण झाली आहे.

अजहर अली, शोएब मलिक, सरफराज अहमद, यासिर शाह आणि मोहम्मद आमिर यांचे ए श्रेणीतील स्थान कायम आहे.

मात्र या करारात ए श्रेणीतून बी श्रेणीत टाकल्यामुळे, मोहम्मद हफिज पाकिस्तान क्रिकेट मंडळा विरुद्ध बंडाच्या तयारीत असल्याचे चर्चा आहे.

पाकिस्तान क्रिकेट मंडळाने ए श्रेणी नाकरल्यामुळे अष्टपैलू हाफिजने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती स्विकारणार असल्याची माहीती आपल्या जवळच्या व्यक्तींपाशी बोलून दाखवली आहे.

पाकिस्तानसाठी ५० कसोटी, २०० एकदिवसीय आणि ८३ टी-२० सामने खेळलेल्या हाफिजने अनेकवेळा पाकिस्तानला अष्टपैलू कामगिरी करत एकहाती विजय मळवून दिले आहेत.

या कारणामुळे हफिजने क्रिकेटमधून निवृत्ती स्विकारल्यास २०१९ च्या एकदिवसीय विश्वचषकापूर्वी पाकिस्तानला मोठा धक्का बसणार आहे.

क्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडी, बातम्या, सदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअॅपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअॅप क्रमांकावर Join Maha असा मेसेज नक्की करा.

महत्त्वाच्या बातम्या:

एमएस धोनीनंतर हर्ष गोएंकानी साधला रवि शास्त्रींवर निशाना

अनुष्का शर्मा टीम इंडियाच्या फोटोमध्ये उपस्थित असण्यामागे हे आहे खरे कारण