तो गोलंदाज म्हणतो, विराटला दौरा गाजवणे तर सोडा एक शतकही करु देणार नाही

भारतीय क्रिकेट संघ नोव्हेंबर महिन्यात ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर जाणार आहे. या दौऱ्याला आणखी तीन महिने अवकाश असतानाच ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटूंनी शाब्दिक युद्ध चालू केले आहे.

ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज पॅट कमिंन्सने भारतीय कर्णधार विराट कोहलीवर निशाना साधत त्याच्याबाबत सीडनी क्रिकेट मैदानावरील एक कार्यक्रमात मोठे वक्तव्य केले आहे.

“या वर्षाच्या अखेरीस ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर येणाऱ्या भारतीय संघाला कसोटी मालिकेत आम्ही सहज पराभूत करु. त्याचबरोबर कर्णधार कोहलीला या कसोटी मालिकेत आम्ही एकही शतक करु देणार नाही. मला माहित आहे  की माझे हे वक्तव्य धाडसी आहे.” या शब्दात पॅट कमिन्सने भारतीय कर्णधार विराट कोहलीला आव्हन दिले.

पॅट कमिन्ससोबत या कार्यक्रमात ऑस्ट्रेलियाचा माजी वेगवान गोलंदाज ग्लेन मॅकग्राथही उपस्थित होता. त्यानेही भारतीय संघावर निशाना साधत कसोटी  मालिकेत ऑस्ट्रेलिया भारताला ४-० ने पराभूत करेल अशी भविष्यवाणी केली.

“मला माहित आहे की विराट सहजा सहजी हार मानणार नाही. अॉस्ट्रेलियन संघाने विराटला लक्ष करुन त्याच्यावर जास्तीत जास्त दबाव टाकण्याचा  प्रयत्न करावा. मला पहायचे आहे की विराट या दबावात कशी कामगिरी करतोय.” ऑस्ट्रेलियाच सर्वश्रेष्ठ वेगवान गोलंदाज मॅकग्राथ असे म्हणाला.

विराट कोहलीची गेल्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यात चांगली कामगिरी झाली होती. त्याने चार कसोटीच्या आठ डावात ८६.५० च्या सरासरीने ६९३ धावा केल्या होत्या. त्यामध्ये ४ शतकांचा समावेश होता.

नोव्हेंबर महिन्यात भारतीय संघ ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर जाणार आहे. त्यामध्ये भारतीय संघ चार कसोटी, तीन एकदिवसीय आणि तीन टी-२० सामन्यांची मालिका खेळणार आहे.

महत्त्वाच्या बातम्या- 

-टीम इंडिया पुन्हा मिळवणार अव्वल स्थान?

-लॉर्ड्सवरील ‘त्या’ सेलिब्रेशनची सौरव गांगुलीला नासीर हुसेनने करुन दिली आठवण