दिग्गजांकडून मिळवली विराटने वाहवा

बर्मिंगहॅम। भारत विरुद्ध इंग्लंड संघात एजबस्टन मैदानावर सुरु असलेल्या पहिल्या कसोटी सामन्यात भाराताचा कर्णधार विराट कोहलीने भारताच्या पहिल्या डावात १४९ धावांसह दमदार शतक झळकावले.

या  शतकासह विराट कोहलीने २०१४ च्या इंग्लंड दौऱ्यातील कटू आठवणी पुसत या इंग्लंड दौऱ्याचा दिमाखदार प्रारंभ केला आहे.

भारताच्या पहिल्या डावात आघाडीचे फलंदाज एका मागून एक बाद होत असताना विराटने तळाच्या फलंदाजांना हाताशी घेत अप्रतिम खेळी केली केली.

एकवेळ इंग्लंड भारतावर मोठी आघाडी मिळवण्याची शक्यता असताना विराटच्या कर्णधार पदाला साजेशी खेळीने इंग्लंडचा भ्रमनिरास केला.

या मालिकेला सुरवात होण्यापूर्वी अनेकांनी विराट या इंग्लंड दौऱ्यात कशी कामगिरी करणार यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते.

मात्र या खेळीने टीकाकारांचे तोंड बंद करत विराटने ट्विटरवरुन अनेक दिग्गजांकडून वाहवा मिळवली.

यामध्ये विराटचे कौतूक करण्यात मास्टर ब्लास्टर सचिन तेंडूलकर, व्हीव्हीएस लक्ष्मण आणि सातत्याने भारतीय खेळाडूंवर टीका करण्याची संधी शोधणारा इंग्लंडचा माजी कर्णधार मायकेल  वॉनही मागे नव्हते.

पहिल्या कसोटी सामन्यात गुरुवारी (२ आॅगस्ट) भारताचा पहिला डाव ७६ षटकात २७४ धावांवर संपूष्टात आला आहे. भारताकडून विराट कोहलीने शतक केले.

तसेच इंग्लंडच्या दुसऱ्या डावाची सुरुवात खराब झाली. त्यांचा अनुभवी सलामीवीर फलंदाज अॅलिस्टर कूक चौथ्या षटकातच शून्य धावांवर असताना त्रिफळाचीत झाला आहे. इंग्लडने दुसऱ्या डावात दुसऱ्या दिवस अखेर १ बाद ९ धावा केल्या आहेत.

क्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडी, बातम्या, सदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअॅपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअॅप क्रमांकावर Join Maha असा मेसेज नक्की करा.

महत्त्वाच्या बातम्या-

विराट, जो रुट नव्हे तर केएल राहुलच जगातील सर्वोत्तम फलंदाज

‘द वॉल’ राहुल द्रविडने केली भविष्यवाणी, कसोटी मालिकेत भारत पाजणार इंग्लंडला पाणी