ड्वेन ब्रावोचा मैदानाबाहेर पुन्हा एकदा धुमाकूळ

विडिंजचा स्टार अष्टपैलू क्रिकेटपटू ड्वेन ब्रावोने आपल्या क्रिकेटच्या कौशल्याबरोबर नृत्य आणि संगीताच्या कौशल्याने अनेकांना कायमच प्रभावीत केले आहे.

याच ड्वेन ब्रावोचे नवे गीत आता सोशल मिडियावर धुमाकूळ घालत आहे.

सध्या कॅरेबियन क्रिकेट लीग सुरु आहे. यामधे आपल्या व्यस्त वेळापत्रकातून वेळ काढत ब्रावोने सोशल मिडीयाच्या माध्यमातून अापले नवे गीत रिलीज केले आहे.

ब्रावोने त्याच्या अधिकृत इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाउंटवरुन ‘बोल देम आउट’ नवे गीत शेअर केले आहे.

ब्रावोच्या या गीताला चाहत्यांनीही जोरदार प्रतिसाद देत पसंत केले आहे.

आपल्या मुक्त जिवनशैलीला साजेसे जीवन जगत प्रत्येक क्षणाचा आनंद लुटण्यावर कॅरेबियन क्रिकेटपटूंचा भर असतो. त्याला ब्रावोदेखील अपवाद नाही.

यापूर्वी २०१६ साली विंडिजने  टी-२० विश्वचषकाचे विजेतेपज पटकावल्यानंतर ब्रावोचे चॅम्पियन हे गीत रिलिज झाले होते. या गाण्याला क्रिकेट रसिकांसह अनेकांनी डोक्यावर घेतले होते.

तर २०१८ च्या आयपीएल दरम्यान ड्वेन ब्रावोचे  ‘रन द वर्ल्ड’ गाने रिलीज  झाले होते. तेव्हा यावर टिम इंडियाचा कर्णधार विराट कोहली, केएल राहुल आणि हरभजन सिंग यांनी ठेका धरला होता.

क्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडी, बातम्या, सदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअॅपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअॅप क्रमांकावर Join Maha असा मेसेज नक्की करा.

महत्त्वाच्या बातम्या:

दुसऱ्या कसोटीत टीम इंडियाकडून खेळणाऱ्या ११ खेळाडूंची यादी सोशल माध्यमांवर लिक

-इंग्लंड विरुद्ध भारत: दुसऱ्या कसोटीच्या पहिल्या दिवसावर पावसाचे पाणी!