हॅशटॅगने बदललं खेळाचं जग !

ट्विटरने हॅशटॅग सुरु करून आज १० वर्ष झाली. अनावधानाने झालेले हे कृत्य पुढे एवढ्या मोठया प्रमाणावर प्रसिद्ध होईल असे कुणालाही वाटले नव्हेत. आज इंटरनेटवरील सर्व विश्व ह्या हॅशटॅगने व्यापले आहे.

जगात अंदाजे १२५ मिलियन हॅशटॅग रोज वापरले जातात. यावर्षी सर्वात जास्त प्रसिद्ध झालेला हॅशटॅग अंदाजे ३००मिलियन वेळा वापरला गेला. जगातील गेल्या १० वर्षातील सर्वात प्रसिद्ध आणि वापरली गेलेली गोष्ट ही हॅशटॅग आहे.

याच हॅशटॅगने खेळ जगतात अनेक बदल घडवून आणले. सर्वात जास्त हॅशटॅग खेळावरच रोज वापरले जातात. आजकाल तर अनेक खेळाच्या स्पर्धांसाठी विशेष आणि अधिकृत हॅशटॅग आयोजक आधीच घोषित करतात. सर्व सोशल माध्यमात ट्विटर हॅशटॅगमध्ये खऱ्या अर्थाने पुढे आहे. ट्विटरवर अनेक खेळांचे किंवा सामन्यांचे हॅशटॅग आपण नेहमी पाहतो.

काय असतो या हॅशटॅगचा उपयोग?
या हॅशटॅगमुळे एखाद्या विषयावर अनेक लोकांची मते आपल्याला पाहायला / वाचायला मिळतात. अगदी आपण ज्या लोकांना कधी भेटलोही नाही किंवा पाहिलेही नाही असे लोक या हॅशटॅगमुळे एकमेकांची मते समजून घेऊन शकतात. हॅशटॅगमुळे त्या शब्दाची एक खास लिंक तयार होते ज्यावर क्लिक करून आपण अनेक गोष्टी वाचू शकतो.

खेळाला कसा झाला फायदा?
जगात अनेक खेळांच्या स्पर्धा अशा आहेत की ज्यांच्या अधिकृत वेबसाइट नाहीत. त्यामुळे तेथे असलेले खेळप्रेमी, पत्रकार, खेळाडू हे याबद्दल स्पर्धा सुरु असलेल्या ठिकाणावरून हॅशटॅग वापरून काही ना काही माहिती देत असतात. त्यामुळे घरबसल्या चाहत्यांना त्या स्पर्धेबद्दल माहिती मिळत असते. काही वेळा न वाचलेली माहिती किंवा न पाहिलेली माहितीही यामुळे जगासमोर येते.

कसा करतात स्पर्धाचा हॅशटॅग
जर श्रीलंका आणि भारत या देशात सामना सुरु असेल आणि तो श्रीलंकेच्या भूमीवर खेळवला जात असेल तर श्रीलंकेतील SL हा शब्द आधी घेतला जातो. विरुद्ध या शब्दासाठी v किंवा vs असा शब्द वापरला जातो. भारतासाठी IND शब्द वापरला जातो. यांचा एकत्रित हॅशटॅग हा #SLvIND किंवा #SLvsIND असा वापरला जातो. परंतु आजकाल विरुद्ध शब्दासाठी फक्त v एवढेच अक्षर वापरले जाते. रिओ ऑलिम्पिकच्या वेळी #Rio2017 असा हॅशटॅग वापरण्यात आला होता.

चॅम्पियन ट्रॉफीसाठी खास हॅशटॅग
यावर्षी इंग्लंड देशात झालेल्या चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी #CT2017 हा हॅशटॅग वापरला गेला होता तसेच अनेक खेळाडूंसाठी ट्विटरने त्यांच्या नावाचा स्मायली असलेला हॅशटॅग ट्विटरने बनवला होता.

क्रिकेटबरोबर फुटबॉल आणि टेनिस जगतातही हॅशटॅग प्रचंड प्रसिद्ध आहे.

पहिला हॅशटॅग केलेला ट्विट: