गुरुबंस कौर, मुरलीकांत पेठकर, शांताराम जाधव यांना स्पोर्ट्सइंडी जीवनगौरव पुरस्कार जाहीर

पुणे । क्रीडा संस्कृतीचे संवर्धन करण्यासाठी प्रयत्नशील असणाऱ्या स्पोर्ट्सइंडी संस्थेच्या वतीने गुरुबंस कौर, मुरलीधर पेठकर, शांताराम जाधव यांना स्पोर्ट्सइंडी जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे.

या पुरस्कारांचे वितरण गुरुवार २२ नोव्हेंबर रोजी सायं ६ वाजता, बालशिक्षण सभागृह, मयूर कॉलनी, एरंडवणे येथे करण्यात येणार असल्याची माहिती स्पोर्ट्सइंडीच्या संस्थापक-संचालिका सुप्रिया बडवे यांनी दिली. यावेळी स्पोर्ट्सइंडीचे समन्वयक श्रीपाद जवळेकर, ए. जी. भंडारी आदी मान्यवर उपस्थित होते.

यावेळी बोलताना सुप्रिया बडवे म्हणाल्या की, सर्वच क्रीडा प्रकारात भारतीय खेळाडू राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय स्तरावर चांगली कामगिरी बजावत आहे. नव्या दमाच्या खेळाडूंना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी आणि त्यांना चांगले व्यासपीठ मिळावे या उद्देशाने स्पोर्ट्सइंडीची सुरुवात करण्यात येणार आहे.

स्पोर्ट्सइंडी जीवनगौरव पुरस्कारांच्या बरोबरीने ‘स्पोर्ट्सइंडी क्रीडा पुरस्कारां’चे वितरण करण्यात येणार आहे. यामध्ये रोहन मोरे, शीतल महाजन, साक्षी महाले, जोसेफ डिसुझा, दत्तू भोकनळ, रणजीत नलावडे, आकांक्षा हागवणे, वेदांगी कुलकर्णी व संपदा बुचडे यांचा समावेश आहे.

मानचिन्ह, रोख रक्कम व तुळशीचे रोप असे या पुरस्कारांचे स्वरूप असणार आहे. भारतीय संघाचे माजी कर्णधार चंदू बोर्डे हे या कार्यक्रमाचे अध्यक्षपद भूषविणार असून यावेळी कारागृह महानिरीक्षक विठ्ठलराव जाधव, पीएमआरडीए आयुक्त किरण गीते, जिल्हा क्रीडा अधिकारी विजय संतान आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

महत्त्वाच्या बातम्या:

मुंबईकर क्रिकेटर पाकिस्तानला नडला, न्यूझीलंडला कसोटीत मिळवून दिला शानदार विजय

नाद कॅच! ग्लेन मॅक्सवेलने घेतला २०१८मधील सर्वात जबरदस्त कॅच

अशी गोलंदाजी तूम्ही क्रिकेटमध्ये यापुर्वी १००% पाहिली नसेल

त्यावेळी एमएस धोनी बनला चक्क टीम इंडियाचा ड्राइव्हर!