मयांक अगरवाल, पृथ्वी शाॅच्या फटाकेबाजी समोर दक्षिण आफ्रिका अ उध्वस्त

बेंगलोर | भारत अ आणि दक्षिण आफ्रिका अ यांच्यात एम चिन्नास्वामी मैदानावर शनिवारी (४ ऑगस्ट) पहिला अनाधिकृत कसोटी सामना सुरु झाला आहे.

या सामन्याच्या दुसऱ्या दिवशी भारताचे सलामीवीर मयांक अगरवाल आणि पृथ्वी शॉने पाहुण्या संघाला झोडपून काढत १६५ धावांची आघाडी मिळवली आहे.

यामध्ये मयांक अगरवारने २५० चेंडूत ४ षटकार आणि ३१ चौकार लगावत नाबाद २२० धावांची खेळी साकारली.

तर पृथ्वी शॉने १९६ चेंडूत १ षटकार आणि २० चौकार लगावत १३६ धावांची खेळी केली आहे.

दक्षिण आफ्रिका अ संघाच्या पहिल्या डावातील २४६ धावांचा पाठलाग करताना भारतीय सलामीवीरांनी पहिल्या विकेटसाठी २७७ धावांची भागिदारी केली.

सामन्याच्या दुसऱ्या दिवसअखेर भारताने २ विकेट गमावून ४११ धावा केल्या आहेत.

दुसऱ्या दिवसाच्या खेळाला सुरवात झाली तेव्हा दक्षिण आफ्रिका संघ त्याच्या पहिल्या दिवसाच्या ८ बाद २४६ धावसंख्येत एकाही धावेची भर न घालता सर्वबाद झाला.

भारताकडून मोहम्मद सिराजने पहिल्या डावात दक्षिण आफ्रिकेचे ५ फलंदाज बाद केले.

संक्षिप्त धावफलक-

दक्षिण आफ्रिका अ पहिला डाव: सर्वबाद २४६ धावा, मोहम्मद सिराज ५/56

भारत अ पहिला डाव: २ बाद ४११, मयांक अगरवाल नाबाद २२० खेळत आहे, पृथ्वी शॉ १३६ धावा. डेन पेडिट १/५६.

क्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडी, बातम्या, सदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअॅपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअॅप क्रमांकावर Join Maha असा मेसेज नक्की करा.

महत्त्वाच्या बातम्या-

-सौरव गांगुली म्हणतो, इंग्लंड जिंकायचे असेल तर हे करु नका

-श्रीलंकन युवा संघ पुन्हा एकदा पडला टीम इंडियाला भारी