ट्रेनर्स, प्रशिक्षकांसाठी स्पोर्ट्स नर्सरी तर्फे कार्यशाळेचे ७ ऑक्टोबर रोजी आयोजन 

पुणे: स्पोर्ट्स नर्सरी यांच्या तर्फे प्रशिक्षक, ट्रेनर्स, पालक, क्रीडाप्रेमींसाठी येत्या रविवार, ७ ऑक्टोबर २०१८ रोजी पीवायसी हिंदू जिमखाना येथे एकदिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे.

प्रामुख्याने क्रीडाविषयक प्रशिक्षण आणि संबंधित उपक्रमांसाठी प्रशिक्षक, ट्रेनर्स यांना विशेष प्रशिक्षण देण्याकरिता या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. तसेच, या कार्यशाळेत  प्रात्यक्षिक आणि थिअरी यांचा समावेश असणार आहे.

या कार्यशाळेत प्रशिक्षकांची भूमिका आणि जबादारी याविषयी सखोल माहिती देण्यात येणार असून मुलांच्या मानसिक व शारीरिक विकासाबद्दल प्रशिक्षक व ट्रेनर्स यांना उद्बोधन करण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे मुलांचे वर्तणूक व्यवस्थापन, परिणामकारक संवाद माध्यम, प्रशिक्षणाच्या पद्धती, सुरक्षित प्रशिक्षण सत्रांचे आयोजन, तसेच विविध क्रीडा प्रकार प्रशिक्षण सत्र, याबरोबरच मनोरंजाचाही समावेश असणार आहे.

या कार्यशाळेत प्रात्यक्षिक सत्रांचाही समावेश असणार आहे. युवकांमधील कौशल्य विकासावर या कार्यशाळेत भर देण्यात येणार असून त्यामुळे विशिष्ट क्षेत्रात नोकरीसाठी मदत होणार आहे.

अधिक माहितीसाठी sportsnursery.in अथवा [email protected]या संकेतस्थळावर किंवा 9822011307यावर संपर्क साधावा.