फेडररपेक्षा जास्त ग्रॅंड स्लॅम जिंकयला आवडेल – राफेल नदाल

नुकत्याच पार पडलेल्या फ्रेंच ओपन स्पर्धेच्या पुरूष एकेरीचे विक्रमी अकराव्या वेळी विजेतेपद मिळवणारा क्ले कोर्टचा किंग राफेल नदाल आपल्या मायदेशी स्पेनला परतला आहे.

विजेतेपदाविषयी नदालने स्पेनमध्ये मार्का या क्रीडा वृत्तपत्राशी मनमोकळ्या गप्पा मारल्या. त्यात त्याने आपला खेळ व वैयक्तीक आयुष्याविषयी मन मोकळे केले.

तो म्हणाला, “मी वयाच्या 32 व्या वर्षी ग्रॅंन्ड स्लॅम स्पर्धा जिंकलोय याचे मलाच आश्चर्य वाटते. कारण काही वर्षांपूर्वी मला वाटले होत की या वयात माझे लग्ल होऊन मला मुले झालेली असतील.

मी आणि रॉजर फेडरर तिशी पार करूनही चांगले टेनिस खेळतोय. गेल्या 18 महिन्यात झालेल्या 6 ग्रॅन्ड स्लॅम स्पर्धेत एकतर मी जिंकतोय नाहीतर फेडरर.”

रविवारी नदालने आपल्या कारकिर्दितले 17 वे ग्रॅंड स्लॅम जिंकले. तर रॉजर फेडररने 20 ग्रॅंड स्लॅम जिंकले आहेत.

तो पुढे म्हणाला मला, “फेडररशी स्पर्धा करायची नाही. मला हा क्षण साजरा करायचा आहे. अर्थात मलाही फेडरर सारखे 20 किंवा त्याच्यापेक्षा जास्त ग्रॅन्ड स्लॅम विजेतेपद मिळवायला आवडतील पण सद्ध्या ते माझ्या डोक्यात नाही. मी माझ्या 17 ग्रॅन्ड स्लॅमचा पुरेपूर आनंद लुटू इच्छीत आहे.”

महत्त्वाच्या बातम्या:

भारतीय गोलंदाजामुळेच भारतीय संघ येणार कसोटी सामन्यात अडचणीत!

इंग्लंड दौऱ्यावर जाणाऱ्या भारतीय फलंदाजांसाठी ही आहे मोठी बातमी

विजेतेपदाची आठवण म्हणून बनवुन घेतला चक्क टॅटू

टीम इंडियातून फिटनेसमुळे संजू सॅमसन आऊट, हा मोठा खेळाडू इन!