विंम्बल्डन २०१८: सुपर मॉम सेरेना विलियम्स उपांत्य फेरीत दाखल

लंडन | मंगळवारी (१० जुलै) महिला एकेरीच्या उपांत्य पूर्व फेरीच्या सामन्यात सेरेना विलियम्सने बिगर मानांकित कॅमिला जिऑर्ज पराभव करत विंम्बल्डन २०१८ ची उपांत्य फेरी गाठली.

पहिला सेट  गमावल्यानंतर या सामन्यात सेरेना विलियम्सने जोरदार पुनरागमन करत कॅमिला जिऑर्जचा ३-६, ६-३,६-४ असा पराभव केला.

२०१८ च्या विंम्बलडन स्पर्धेत सेरेनाला प्रथमच इतके तगडे आव्हान मिळाले होते.

“मी ज्या ज्या वेळी कॅमिला जिऑर्ज विरुद्ध खेळते त्या त्या वेळी ती मला तगडे आव्हान देते. मला माहित होते कॅमिलाचा सामना करणे सोपे नव्हते. पहिल्या सेट गमावल्यानंतर मी स्वत:लाच म्हणाले की लढत रहा आणखी तीन सेट बाकी आहेत.” आपल्या आठव्या विंम्बलडन विजेतेपदाच्या प्रतिक्षेत असलेली सेरेना विलियम्स म्हणाली.

सेरेनाचा उपांत्य फेरीचा सामना जर्मनीच्या १३ व्या मानांकित ज्युलिया जॉर्जेस विरुद्ध होणार आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

-ऑस्ट्रेलियन गोलंदाज म्हणतो आम्ही विराटला एकहि शतक करु देणार नाही

-टीम इंडिया पुन्हा मिळवणार अव्वल स्थान?