महिला हॉकी विश्वचषक: तब्बल आठ वर्षानंतर भारताला मिळाला पहिला विजय

लंडन | मंगळवारी (३१ जुलै) महिला हॉकी विश्वचषकात भारताने बाद फेरीच्या सामन्यात इटलीचा ३-० असा पराभव करत उपांत्य पूर्व फेरी गाठली.

याचबरोबर विश्वचषक स्पर्धेत भारताने आठ वर्षानंतर विजय प्राप्त केला. गेल्या दोन विश्वचषकासाठी पात्र न झाल्याने भारताला या स्पर्धेत सहभागी होता आले नव्हते.

या एकतर्फी झालेल्या सामन्यात भारताने इटालीवर पूर्णपणे वर्चस्व गाजवले.

भारताकडून या सामन्यात नेहा गोयलने, लालरेम सियामी आणि वंदना कटारीयाने गोल केले.

सामन्याच्या ९ व्या मिनिटाला लालरेम सियामीने गोल करत भारताला जबरदस्त  सुरवात करुन दिली.

त्यानंतर नेहा गोयलने ४५ मिनिटाला तर वंदना कटारीयाने ५५ व्या मिनिटाला गोल करत भारताला विजयी आघाडी मिळवून दिली.

महिला हॉकी क्रमवारीत १७ व्या स्थानी असलेल्या दुबळ्या इटलीला भारताने या सामन्यात गोल करण्याची एकही संधी दिली नाही.

भारताची उपांत्य पूर्व फेरीत २ ऑगस्टला आयर्लंडशी गाठ पडणार आहे.

क्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडी, बातम्या, सदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअॅपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअॅप क्रमांकावर Join Maha असा मेसेज नक्की करा.

महत्त्वाच्या बातम्या:

-तरच भारतीय गोलंदाज इंग्लंडमध्ये यशस्वी होतील

-‘हे’ केल्यास विराट कोहलीला मोठी खेळी करण्यापासून कोणी रोखू शकणार नााही