धोनी आणि हेडन खेळणार टीएनपीएलच्या षटकार मारण्याच्या स्पर्धेत !

तामिळनाडू प्रमियर लीग येत्या रविवारी सुरु होणार आहे. पहिला सामना मागील पर्वातील विजेता संघ अल्बर्ट टूटी पॅट्रीयोट्स आणि डिंडीगुल ड्रेगन्स यांच्यामध्ये चेन्नईतील एम ए चिदंबरम स्टेडियम होणार आहे.

या पर्वाची सुरुवात एका षटकार मारण्याच्या स्पर्धेने होणार आहे.

भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी, मोहित शर्मा, एस. बद्रीनाथ, पवन नेगी, ऑस्ट्रेलियाचा माजी फलंदाज मॅथ्यू हेडन आणि तमिळनाडूचा फलंदाज अनिरुद्ध श्रीकांत हे या स्पर्धेत भाग घेतील.

चेन्नई सुपरकिंग्ज क्रिकेट लिमिटेडनेने प्रायोजित केलेल्या या स्पर्धेत भारतीय संघाचे माजी गोलंदाज एल. बालाजी, एम विजय व तमिळनाडूतील अष्टपैलू क्रिकेटपटू सी गणपती या कार्यक्रमाला उपस्थित असतील.

ही स्पर्धा 6 वाजता सुरू होईल आणि रात्री 7 वाजता संपेल. त्यानंतर सलामीचा सामना ७:१५ वाजता चालू होईल.