महिलांच्या ऐतिहासिक आयपीएल टी२०साठी संघांची घोषणा

मुंबई | महिलांची टी२० चॅलेंज सामना २२ मे रोजी वानखेडे स्टेडियमवर खेळवला जाणार आहे. हा सामना आयपीएल २०१८च्या क्वाॅलिफायर १ सामन्याच्या आधी खेळवला जाणार आहे. यासाठी आज संघाची घोषणा करण्यात आली.

या सामन्यात स्म्रिती मानधना आणि हरमनप्रीत कौर या दोन संघांच नेतृत्व करणार आहे. या दोन संघांकडून आॅस्ट्रेलिया, न्युझीलंड तसेच इंग्लंडच्या महिला खेळाडू खेळताना दिसतील.

यात प्रत्येक संघात १३ अशा एकुण २६ खेळाडूंची निवड करण्यात आली आहे. प्रत्येक संघात ५ बाहेरच्या देशातील खेळाडू आहे.

यावर्षी झालेल्या महिलांच्या विश्वचषकाला मोठ्या प्रमाणावर चाहत्यांचा पाठिंबा लाभला होता. याचमुळे बीसीसीआयने महिला खेळाडूंसाठी खास सामन्याचे आयोजन केले आहे.

असे आहेत संघ-

आयपीएल ट्रेलब्लेझर्स- अायसा हेली (यष्टीरक्षक), स्म्रिती मानधना (कर्णधार), सुझी बेट्स, दिप्ती शर्मा, जेमीमी रोड्रीग्ज, बेथ मुनी, डॅनियल हेजल, शिखा पांडे,ली ताहूहु, झुलन गोस्वामी, एकता बिश्त, पुनम यादव, दयालन हेमलता. प्रशिक्षक- तुषार आरोटे

आयपीएल सुपरनोवाज- डॅनियल वॅट, मिताली राज, मेग लेनिंज्स, हरमनप्रित कौर (कर्णधार), सोफी डेविन, एलिसा पेरी, वेदा कृष्णमुर्ती, मोना मेश्राम, पुजा वस्त्राकर, मेगन कट्स, राजेश्वरी गायकवाड, अनुजा पाटील, तानिया भाटिया (यष्टीरक्षक). प्रशिक्षक- विजु जाॅर्ज