विंडीज दौऱ्यासाठी टीम इंडियाची घोषणा; या युवा खेळाडूंना मिळाली संधी

भारतीय संघ पुढील महिन्यात विंडीज दौऱ्यावर जाणार आहे. 3 ऑगस्टपासून सुरु होणाऱ्या या विंडीज दौऱ्यात तीन वनडे, तीन टी20 आणि दोन कसोटी सामन्यांची मालिका होणार आहे. कसोटी मालिका ही आयसीसी टेस्ट चॅम्पियशिपचा भाग असेल. या दौऱ्यासाठी बीसीसीआय निवड समीतीने आज भारतीय संघाची घोषणा केली आहे.

भारतीय संघाचा नियमित कर्णधार विराट कोहली या संपूर्ण दौऱ्यासाठी उपलब्ध असल्याने तोच या दौऱ्यातील तिन्ही प्रकारच्या मालिकेत भारताचे नेतृत्त्व करणार आहे. तर मर्यादीत षटकांच्या क्रिकेटसाठी रोहित शर्मा उपकर्णधार असणार आहे. तसेच कसोटी मालिकेसाठी अजिंक्य रहाणे उपकर्णधार असणार आहे.

या दौऱ्यातील मर्यादीत षटकांच्या मालिकांसाठी शिखर धवनचाही समावेश करण्यात आला आहे. मात्र त्याला कसोटी संघातून वगळण्यात आले आहे. कसोटीमध्ये सलामीवीर म्हणून केएल राहुल आणि मयंक अगरवाल यांचा समावेश करण्यात आला आहे. त्याचबरोबर रोहित आणि वृद्धीमान सहाने कसोटी संघात पुनरागमन केले आहे.

भारताचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहला मर्यादीत षटकांसाठी विश्रांती देण्यात आली आहे. पण त्याला कसोटी संघात संधी दिली आहे.

त्याचबरोबर सध्या विंडीज दौऱ्यावर असणाऱ्या भारत अ संघातील श्रेयस अय्यर, मनिष पांडे, नवदीप सैनी, खलील अहमद या खेळाडूंना वनडे तसेच टी20 संघात संधी मिळाली आहे. तर वॉशिंग्टन सुंदर, कृणाल पंड्या, दीपक आणि राहुल चहर यांना टी20 संघात संधी मिळाली आहे.

तसेच भारताचा नियमीत यष्टीरक्षक एमएस धोनी या विंडीज दौऱ्यासाठी अनुपलब्ध असल्याचे त्याने अधीच कळवले असल्याने तीन्ही प्रकारात रिषभ पंतला यष्टीरक्षक म्हणून पसंती मिळाली आहे.

याबरोबरच हार्दिक पंड्याला या संपूर्ण दौऱ्यासाठी विश्रांती देण्यात आली आहे. त्याला पाठीच्या दुखापतीचा त्रास होत असल्याचे बोलले जात आहे.

विंडीज दौऱ्यासाठी असा आहे भारताचा संघ –

टी20 मालिका – विराट कोहली (कर्णधार), रोहित शर्मा (उपकर्णधार), शिखर धवन, केएल राहुल, श्रेयस अय्यर, मनीष पांडे, रिषभ पंत (यष्टीरक्षक), कृणाल पंड्या, रवींद्र जडेजा, वॉशिंग्टन सुंदर, राहुल चहर, भुवनेश्वर कुमार, खलील अहमद, दीपक चहर , नवदीप सैनी.

वनडे मालिका – विराट कोहली (कर्णधार), रोहित शर्मा (उपकर्णधार), शिखर धवन, केएल राहुल, श्रेयस अय्यर, मनीष पांडे, रिषभ पंत (यष्टीरक्षक), रवींद्र जडेजा, कुलदीप यादव, युजवेंद्र चहल, केदार जाधव, मोहम्मद शमी, भुवनेश्वर कुमार, खलील अहमद, नवदीप सैनी.

कसोटी मालिका – विराट कोहली (कर्णधार), अजिंक्य रहाणे (उपकर्णधार), मयंक अग्रवाल, केएल राहुल, चेतेश्वर पुजारा, हनुमा विहारी, रोहित शर्मा, रिषभ पंत (यष्टीरक्षक), वृद्धिमान साहा (यष्टीरक्षक), आर अश्विन, रविंद्र जडेजा, कुलदीप यादव, इशांत शर्मा, मोहम्मद शमी, जसप्रीत बुमराह, उमेश यादव

असा असेल भारताचा विंडीज दौरा 2019 – 

टी20 मालिका –

3 ऑगस्ट – पहिला टी20 सामना – फ्लोरीडा

4 ऑगस्ट – दुसरा टी20 सामना – फ्लोरीडा

6 ऑगस्ट – तिसरा टी20 सामना – गयाना

वनडे मालिका –

8 ऑगस्ट – पहिला वनडे – गयाना

11 ऑगस्ट – दुसरा वनडे – त्रिनिदाद

14 ऑगस्ट – तिसरा वनडे – त्रिनिदाद

कसोटी मालिका –

22 ते 26 ऑगस्ट – पहिली कसोटी – अँटीग्वा

30 ऑगस्ट ते 3 सप्टेंबर – दुसरा कसोटी – जमैका

क्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडी, बातम्या, सदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअप क्रमांकावर Join Maha असा मेसेज नक्की करा.

महत्त्वाच्या बातम्या –

डब्ल्यूडब्ल्यूईचा सुपरस्टार ट्रिपल एचने विश्वविजेत्या इंग्लंडला दिली ही खास भेट

या कारणामुळे सचिनचा झाला द्रविड, कुंबळेनंतर हॉल ऑफ फेममध्ये समावेश

आर अश्विनने टाकलेल्या या चेंडूचा व्हिडिओ होतोय जोरदार व्हायरल, पहा व्हिडिओ