त्या ट्विटबद्दल श्रीशांतने मागितली बीसीसीआयची माफी !

दिवसांपूर्वी केलेल्या ट्विटबद्दल श्रीशांतने भारतीय क्रिकेट मंडळाची पुन्हा माफी मागितली आहेत. भारतीय क्रिकेट मंडळाच्या श्रीशांतबद्दल भारतीय केरळ हायकोर्टाने दिलेल्या निर्णयाला खंडपीठात अपील करण्याच्या निर्णयाला श्रीशांतने तीव्र आक्षेप घेतला होता. तसेच ट्विटरच्या माध्यमातून नाराजी व्यक्त केली होती.

याबद्दल त्याच दिवशी ट्विट करत त्याने माफी मागितली. त्याने त्यासाठी पुन्हा ट्विटरचा सहारा घेतला. श्रीशांत आपल्या ट्विट मध्ये म्हणतो, ” मला माझ्या राज्यासाठी क्रिकेट खेळण्याची तीव्र इच्छा आहे त्यामुळे मी चुकून माझ्या पालक संघटनेला अर्थात बीसीसीआयला हे ट्विट केले. त्याबद्दल मी बीसीसीआयची तसेच जे कुणी यामुळे दुखावले असतील त्यांची माफी मागतो. ”

कोणते ट्विट श्रीशांतने केले होते… 

पहिल्या ट्विटमध्ये श्रीशांत म्हणतो, ” एखाद्या निरपराधी माणसाबरोबर अजून किती वाईट वागणार आहे भारतीय क्रिकेट नियामक मंडळ. ते पण नाही तर अनेक वेळा. तुम्ही एवढं वाईट का वागताय माझ्याशी? ”

श्रीशांत पुढे म्हणतो, “बीसीसीआय म्हणते आम्ही भ्रष्टाचाराविरुद्ध ठाम भूमिका घेतो. मग राजस्थान रॉयल्स आणि चेन्नई सुपर किंग्सला वेगळी वागणूक का?”