२४ तासांसाठी श्रीलंका संघ जाणार पाकिस्तान दौऱ्यावर

श्रीलंकेचा संघाने पाकिस्तानमधील लाहोर शहरात तिसरा टी२० सामना खेळण्यास होकार दिला आहे. श्रीलंकेच्या ४० खेळाडूंनी श्रीलंका क्रिकेट बोर्डकडे पात्र लिहून विनंती केली होती की आम्हाला पाकिस्तानमध्ये खेळायचे नाही. पण शनिवारी बोर्ड सदस्यांबरोबर चर्चा केल्यानंतर श्रीलंकेच्या खेळाडूंनी खेळण्यास होकार दिला आहे.

श्रीलंका क्रिकेट बोर्डाने सोमवारी निश्चित केले की श्रीलंका पाकिस्तानमध्ये खेळेल. श्रीलंका क्रिकेट बोर्डाचे व्यवस्थापक असांका गुरूसिंह यांनी अशी माहिती दिली की श्रीलंकेचा संघ फक्त २४ तासांसाठी पाकिस्तानमध्ये असेल.

असांका गुरूसिंह म्हणाले
“एसएलसी या अडचणीतून बाहेर येण्यासाठी प्रयत्न करत आहे. आम्ही फक्त २४ तास लाहोरमध्ये असू. आम्ही सामना झाल्यानंतर लगेचच तेथून निघू. “

२००९ मध्ये श्रीलंकेच्या संघावर पाकिस्तानमध्ये दहशदवादी हल्ला झाला होता. लाहोरच्या याच शहरात श्रीलंकेच्या बसवर दहशदवाद्यांनी गोळीबार केला होता. त्यानंतर पाकिस्तानमधील आंतरराष्ट्रीय सामने बंद करण्यात आले होते.

पण याच वर्षी पाकिस्तान आणि वर्ल्ड ११ या दोन संघांमध्ये एक टी२० मालिका पाकिस्तानमध्येच खेळण्यात आली होती. तेव्हा जगभरातील खेळाडू तेथे गेले होते. त्यामुळे सुरक्षेचा प्रश्न चिन्ह येण्याचे काहीच करणार नाही.