तिसरी कसोटी: तिसऱ्या दिवसाच्या समाप्तीनंतर श्रीलंका ९ बाद ३५६

दिल्ली । येथे सुरु असलेल्या भारत विरुद्ध श्रीलंका यांच्यातील तिसऱ्या आणि अखेरच्या कसोटी सामन्यात भारतीय गोलंदाजांनी श्रीलंकेच्या डावाला खिंडार पाडत ९ बाद ३५६ अशी अवस्था केली आहे.

श्रीलंकेकडून अँजेलो मॅथ्यूजने शतकी खेळी करताना २६८ चेंडूत १११ धावा केल्या आहेत तर कर्णधार चंडिमल ३४१ चेंडूत १४७ धावांवर खेळत आहे. समरविक्रमाने ६१ चेंडूत ३३ धावा करताना संघाच्या धावसंख्येचा थोडीफार भर घालण्याचा प्रयत्न केला.

भारताकडून आर अश्विन ३, रवींद्र जडेजा २, इशांत शर्मा २ आणि मोहम्मद शमी २ यांनी विकेट्स घेतल्या आहेत. उद्या भारतीय संघ लंकेचा डाव लवकर आटोपून पुन्हा फलंदाजीला येण्याचा प्रयत्न करेल.

संक्षिप्त धावफलक:
अँजेलो मॅथ्यूज १११ धावा
दिनेश चंडिमल १४७ धावांवर खेळत आहे, संदाकन ० धावांवर खेळत आहे.
आर अश्विन ३/९०, रवींद्र जडेजा २/८५, इशांत शर्मा २/७४ आणि मोहम्मद शमी २/९३