या खेळाडूने केले आज भारताकडून पदार्पण

मोहाली । भारत विरुद्ध श्रीलंका यांच्यातील दुसऱ्या सामन्यात वॉशिंग्टन सुंदर या खेळाडूला संधी देण्यात आली आहे. भारताकडून वनडेत खेळणारा तो २२०वा खेळाडू ठरणार आहे. त्याला कुलदीप यादवच्या जागी संधी देण्यात आली आहे. 

भारताचा फलंदाज केदार जाधवला दुखापतीमुळे भारत विरुद्ध श्रीलंका या मालिकेला मुकावे लागले. त्यामुळे भारतीय संघात केदार ऐवजी तामिळनाडूचा नवोदित खेळाडू वॉशिंग्टन सुंदरची बदली खेळाडू म्हणून निवड झाली होती.

आज दुसऱ्या वनडेत त्याला पदार्पणची संधी मिळाली. तो यावर्षीच्या आयपीएलमध्ये रायझिंग पुणे सुपरजायंट्स संघातून खेळला आहे. या संघातून खेळताना त्याने चांगली कामगिरी केली होती.

याबरोबरच तामिळनाडू प्रीमियर लीगमध्ये तो सर्वाधिक धावा करणारा खेळाडू बनला होता तसेच तो याच लीगमध्ये सर्वाधिक बळी घेणारा दुसऱ्या क्रमांकाचा खेळाडू बनला होता. तसेच तो यावर्षीच्या तामिळनाडूच्या रणजी संघातूनही खेळला आहे.

भारतीय संघ: रोहित शर्मा, शिखर धवन, श्रेयस अय्यर, दिनेश कार्तिक, मनीष पांडे, एमएस धोनी, हार्दिक पंड्या, भूवनेश्वर कुमार, वॉशिंग्टन सुंदर, जसप्रीत बुमराह, युझवेन्द्र चहल