VIDEO: १ चेंडू फेकण्यासाठी वहाब रियाझने घेतला ५वेळा रन-अप

आजपर्यंत क्रिकेटने चाहत्यांना अनेक वेगवेगळ्या आठवणी दिल्या आहेत. परंतु काल पाकिस्तान विरुद्ध श्रीलंका यांच्यातील दुसऱ्या कसोटी सामन्यात जे झाले ती नक्कीच एक विचित्र आठवण म्हणून इतिहासात नोंद होणार आहे.
पाकिस्तानचा डावखुरा वेगवान गोलंदाज वहाब रियाझने १११व्या षटकात १ चेंडू फेकण्यासाठी तब्बल ५वेळा रन-अप घेतला. पाकिस्तान विरुद्ध श्रीलंका दुसऱ्या कसोटीत दुसऱ्या दिवशी जेव्हा कर्णधार सर्फराज अहमदने वहाब रियाझला गोलंदाजीला पाचारण केले तेव्हा षटकातील ५वा चेंडू टाकण्यासाठी वहाब रियाझने चक्क ५वेळा रन-अप घेतला.
— Kyran Pick (@kyranpick) October 9, 2017
यावेळी पाकिस्तान संघाचे मुख्य प्रशिक्षक मिकी आर्थर हे अतिशय चिडलेले दिसले. ते एकदा जागेवरून उठून ड्रेसिंग रूममध्ये गेले तर पुन्हा अतिशय नाराज होत बाहेर आले.
जेव्हा ५वा चेंडू बरोबर गेला तेव्हा तो श्रीलंकेच्या डिकवेलला मारता आला नाही. त्यानंतर या खेळाडूने ३.३ षटकांत १० धावा देत ३ विकेट्स घेतल्या.
Wahab Riaz misses his run-up " FIVE TIMES " in a row
Mickey Arthur's Reaction ????#PakvSL #PakvsSL pic.twitter.com/8252dD2F7k
— Ahsan. ?? (@iPakistaniLAD) October 7, 2017