जेव्हा श्रीलंकेचे मंत्रीच उडवितात श्रीलंकन खेळाडूंची टर !!!

सध्या श्रीलंका संघ गेल्या २ महिन्यात अनेक पराभवांना सामोरा गेला आहे. झिम्बाब्वे विरुद्धची एकदिवसीय मालिका, चॅम्पियन्स ट्रॉफी, भारताबरोबर सुरु असलेली कसोटी मालिका असे अनेक पराभव सध्या संघ पाहत आहे.

त्यामुळे या संघावर सोशल मेडियाच्या माध्यमातून जोरदार टीका होत आहे. त्यात माजी खेळाडूतर संघाची इज्जत काढणारी वक्तव्य करत आहे. कुणी श्रीलंकेच्या संघाचे सामने पाहणे बंद केल्याचं सांगत आहे तर कुणी सोशल मीडियापासून दूर राहायला संघात आहे.

परंतु यातील संघाचं मनोधैर्य मोठ्याप्रमाणावर खच्ची करणारी गोष्ट तेव्हा घडली जेव्हा एका मंत्र्यानेच श्रीलंकन खेळाडूंची टर उडवणारा ट्विट केला. आर्थिक विकास मंत्रालयाचे उपमंत्री असलेल्या हर्षा डी सिल्वा यांनी संघाची खिल्ली उडवताना भारतीय कर्णधार विराट कोहली बरोबर एक फोटो शेअर केला आहे.

ज्या फोटोबरोबर ते म्हणतात, ” मी विराटला सांगितले आहे पुढच्या कसोटी सामन्यात थोडं हळू खेळा. ६०० धावा खूपच जास्त होतात. ”