हे ८ संघ झाले विश्वचषक २०१९ ला पात्र

श्रीलंका संघ विश्वचषक २०१९ला थेट पात्र ठरणारा ८वा आणि शेवटचा संघ ठरला. विंडीज संघ इंग्लंडविरुद्ध पहिल्या वनडे सामन्यात ७ विकेट्सने पराभूत झाला आहे. त्यामुळे ते थेट पात्र होण्याच्या स्पर्धेतून बाहेर गेले आहेत.त्यांना यापुढे पात्रता फेरीतुन पात्र होऊन स्पर्धेत भाग होता येईल.

३० सप्टेंबर ही या स्पर्धेसाठी थेट पात्र ठरण्याची शेवटची तारीख होती. विंडीजचे सध्या ७८ पॉईंट्स होते. श्रीलंका संघाचे ८६ पॉईंट्स आहेत. त्यामुळे आता विंडीज इंग्लंड विरुद्धची मालिका जरी जिंकली तरी त्यांचे पॉईंट्स हे श्रीलंका संघापेक्षा जास्त होणार नाही.

विंडीजला इंग्लंड विरुद्धची ५ सामन्यांची वनडे मालिका ४-० किंवा ५-० अशी जिंकायची गरज होती. जर ते ही मालिका असे जिंकले असते तर ते लंकेच्या पुढे गेले असते. परंतु पहिल्याच वनडे सामन्यात पराभवाला सामोरे गेल्यामुळे त्यांच्या स्वप्नांना मोठा धक्का बसला आहे.

याबरोबर श्रीलंकेने ऑस्ट्रेलिया, बांगलादेश, भारत, न्यूझीलँड, पाकिस्तान, आणि दक्षिण आफ्रिका देशांबरोबर विश्वचषक २०१९ला थेट पात्र ठरणाऱ्या देशांत स्थान मिळवले आहे. इंग्लंड देश हा यजमान देश असल्यामुळे हा संघ सरळ पात्र ठरला आहे. हा विश्वचषक मे ३० ते जुलै १५ या काळात इंग्लंड देशात होणार आहे.

२०१९ क्रिकेट विश्वचषकाला पात्र ठरलेले देश:
ऑस्ट्रेलिया, बांगलादेश, भारत, न्यूझीलँड, पाकिस्तान, दक्षिण आफ्रिका, इंग्लंड, श्रीलंका