चौथ्या वनडे’साठी मोठी सुरक्षा व्यवस्था, १००० अधिक पोलीस तैनात

भारत विरुद्ध श्रीलंका यांच्यादरम्यान होणाऱ्या चौथ्या वनडे सामन्यासाठी मोठ्या प्रमाणावर सुरक्षा व्यवस्था पुरवली जाणार आहे. गेल्या सामन्यात झालेल्या प्रकारची पुनरावृत्ती होऊ नये म्हणून श्रीलंकन पोलीस सर्वोतोपरी प्रयत्न करणार आहेत.

या सामन्यात १००० जास्त पोलीस कर्मचारी तैनात करण्यात येणार असून सीसीटीव्ही कॅमेऱ्यावरून प्रेक्षकांवर लक्ष ठेवले जाणार आहे. कोलंबोमधील प्रेमदासा मैदानाची क्षमता ३५,००० प्रेक्षकांची असून कोणतीही संशयास्पद कृती करणाऱ्या प्रेक्षकाला लगेच अटक करणार असल्याचं कोलंबो पोलिसांनी सांगितलं आहे.

श्रीलंका संघाची धुरा वेगवान गोलंदाज लसिथ मलिंगा संभाळणार असून भारत उद्या आणि रविवारी असे राहिलेलं दोन वनडे सामने तर एकमेव टी२० सामना ६ सप्टेंबर रोजी खेळणार आहे.