युवराज सिंगच्या त्या ६ षटकारांवरुन स्टुअर्ट ब्राॅडने केले स्वत:लाच जोरदार ट्रोल

इंग्लंडचा दिग्गज वेगवान गोलंदाज स्टुअर्ट ब्राॅडने स्वत:लाच ट्रोल करुन घेतले आहे. त्याने इंस्टाग्रामवर इंग्लंड क्रिकेटच्या पोस्टला एक कमेंट करत हे ट्रोल करुन घेतले आहे.

त्याचे झाले असे की सध्या सुरु असलेल्या श्रीलंका विरुद्ध इंग्लंड दुसऱ्या कसोटी मालिकेतील पहिल्या सामन्यात सॅम करनने चमकदार कामगिरी केली. ११९ चेंडूत ६४ धावांचा त्याची खेळी केली. या खेळीदरम्यान करनने ६ षटकार आणि १ चौकार मारला.

वाचा- टीम इंडियाला नडलेल्या सॅम करनचा श्रीलंकेला तडाखा

अर्धशतक करण्यापुर्वी त्याने ५० धावांपैकी तब्बल ३६ धावा षटकारांच्या मदतीने जमवल्या होत्या. यामुळे इंग्लड क्रिकेटने त्याचा इंस्टाग्रामवर फोटो शेअर केला. तसेच या फोटोला खास कॅप्टन दिला. त्यात त्यांनी म्हटले की, कधी पाहिले आहे का खेळाडूने पहिला चौकार मारण्यापुर्वी ६ षटाकार मारले आहेत?

यावर ब्राॅडने युवराजला टॅग करत प्रश्नचिन्ह लिहीले आहे. तसेच स्माईलीही पोस्ट केली आहे.

वाचा महत्त्वाच्या बातम्या-