धोनीच्या खेळीवर दिग्गजांच्या प्रतिक्रिया !

१०९ धावांवर १ अशा सुस्थितीत असणाऱ्या भारतीय संघाला अकिला धनंजयाने आपल्या फिरकी गोलंदाजीवर अक्षरशः नाचवले. यातून एकवेळ भारताची अवस्था ७ बाद १३७ अशी झाली होती. परंतु एमएस धोनी आणि भुवनेश्वर कुमार यांनी ८व्या विकेटसाठी केलेल्या विक्रमी भागीदारीमुळे भारताने लंकेच्या हातातोंडाशी आलेला घास हिरकावुन घेतला.

त्यामुळे एमएस धोनीवर शुभेच्छांचा वर्षाव होणे साहजिकच होते. संथ पण जबाबदार खेळी करणाऱ्या या दिग्गज खेळाडूचे क्रिकेट जगतासह अनेक दिग्गजांनी ट्विटरच्या माध्यमातून कौतुकही केले.