विश्वचषक २०१९: असा आहे श्रीलंकेचा १५ जणांचा संघ; या अनुभवी खेळाडूंना संधी नाही

इंग्लंड आणि वेल्समध्ये 30 मेपासून आयसीसी विश्वचषक स्पर्धा रंगणार आहे. त्यामुळे या स्पर्धेसाठी सहभागी संघांनी 15 जणांचे संघ जाहीर करण्यास सुरुवात केली आहे. 23 एप्रिल ही 15 जणांचा संघ जाहीर करण्याची शेवटची तारिख आहे.

आज(18 एप्रिल) श्रीलंका क्रिकेट बोर्डाने त्यांचा 15 जणांचा संघ जाहीर केला आहे. त्यापूर्वी काल(17 एप्रिल) श्रीलंकेने लसिथ मलिंगाला वनडे संघाच्या कर्णधारपदावरुन हटवत दिमुथ करुणारत्नेवर वनडे संघाची धूरा सोपवली आहे. त्यामुळे तोच या विश्वचषकात श्रीलंका संघाचे नेतृत्व करणार आहे. त्याने त्याचा शेवटचा वनडे सामना 2015 च्या विश्वचषकात खेळला आहे.

करुणारत्नेने काही महिन्यांपूर्वी दक्षिण आफ्रिका दौऱ्यात पहिल्यांदाच श्रीलंकेच्या कसोटी संघाचे नेतृत्व करताना दक्षिण आफ्रिकेला 2-0 असा कसोटी मालिकेत व्हाईटवॉश दिला होता आणि त्याच्यातील नेतृत्वगुण असल्याचे दाखवून दिले होते.

आज 2019 विश्वचषकासाठी निवडण्यात आलेल्या श्रीलंका संघात लहिरु थिरिमन्ने, मलिंडा सिरिवर्धना, जीवन मेंडिस आणि जाफ्री वेंडर्से यांना संधी मिळाली आहे. विशेष म्हणजे ते 2017 पासून वनडे क्रिकेट खेळलेले नाही.

त्याचबरोबर निरोशान डिकवेल्ला, अकिला धनंजया, दनुष्का गुणातिलका, उपुल थरंगा आणि माजी कर्णधार दिनेश चंडीमल या खेळाडूंना मात्र संधी मिळालेली नाही.

तसेच लसिथ मलिंगाला जरी कर्णधारपदावरुन काढले असले तरी मात्र त्याची विश्वचषकासाठी 15 जणांच्या संघात निवड करण्यात आली आहे.

असा आहे 2019 विश्वचषकासाठी श्रीलंका संघ- 

दिमुथ करुणारत्ने (कर्णधार), अविष्का फर्नांडो, लाहिरु थिरिमान्ने, कुसल परेरा, कुसल मेंडीस, अँजेलो मॅथ्यूज, धनंजय डी सिल्वा, जेफ्री वेंडर्से, थिसरा परेरा, इशुरु उडाना, लसिथ मलिंगा, सुरंगा लकमल, नुवान प्रदीप, जीवन मेंडिस, मिलिंडा सिरीवर्दना

महत्त्वाच्या बातम्या –

रायडू, पंत, सैनी बरोबर विश्वचषकासाठी या दोघांनाही मिळाली राखीव खेळाडूंमध्ये संधी

चार वर्षांपासून एकही वनडे न खेळलेला क्रिकेटपटू करणार विश्वचषकामध्ये श्रीलंकेचे नेतृत्व

चेन्नई सुपर किंग्सच्या बाबतीत चौथ्यांदाच घडली अशी गोष्ट