मोठ्या खेळाडूची विंडीज दौऱ्यातून माघार

श्रीलंका विरूद्ध वेस्ट इंडीज यांच्यात तीन कसोटी क्रिकेट सामन्यांची मालिका चालू आहे.पहिल्या कसोटीत श्रीलंकेला दारून पराभव पत्करावा लागला.

त्यातच अष्टपैलू खेळाडु अंजेलो मॅथ्यूज व जलगती गोलंदाज लहिरू गमागे हे दोघेजण मायदेशी परतलेत. त्यामुळे श्रीलंकेला मोठा धक्का बसला आहे.

श्रीलंका क्रिकेट मंडळाने प्रसिद्ध केलेल्या पत्रकात म्हटले आहे कि, पहिल्या कसोटीत फलंदाजी करताना हाताच्या बोटाला गमागेला  दुखापत झाली. तर मॅथ्यूजने वैयाक्तिक कारणांमुळे उर्वरित मालिकेतून माघार घेतली. दासून शनाका आणि दनुष्का गुनाथिलका या दोघांचा उर्वरित दोन कसोटी सामन्यांसाठी संघात समावेश करण्यात आला आहे. सलामीवीर करूनारत्ने नेटसमध्ये सराव करताना दुखापत झाल्याने या अगोदरच मालिकेतून बाहेर पडला आहे.

 दुसऱ्या कसोटीला आजपासून सेंट ल्युसिया येथील मैदानावरून सुरूवात होत आहे.

महत्त्वाच्या बातम्या:

सलामीविर मुरली विजयचे शानदार शतक

टाॅप ३- या भारतीय ओपनरने केली आहेत कसोटीत सर्वाधिक शतके

फक्त आणि फक्त फिटनेससाठी धोनीने केला प्राणाहुन प्रिय गोष्टीचा त्याग