कि. श्रीकांत फ्रेंच ओपन सुपर सेरीजच्या अंतिम फेरीत

आज फ्रेंच ओपन सुपर सिरीजची अंतिम फेरी रंगणार आहे. भारताचा किदांबी श्रीकांतने काल उपांत्य फेरीत विजय मिळवून या स्पर्धेच्या अंतिम फेरीत धडाक्यात प्रवेश केला आहे.

काल उपांत्य फेरीत किदांबी श्रीकांत विरुद्ध एच एस प्रणॉय असा सामना रंगला होता. या दोन भारतीय बॅडमिंटनपटूमध्ये चांगलीच झुंज बघायला मिळाली. अखेर १ तास २ मिनिटे चाललेल्या या लढतीत किदांबी श्रीकांतने १४-२१, २१-१९, २१-१८ असा विजय मिळवला आणि स्पर्धेची अंतिम फेरी गाठली. आता त्याचा अंतिम सामना जपानच्या केंट निशिमोटोशी रंगणार आहे.

श्रीकांतने यावर्षी पाचव्यांदा अंतिम फेरीत प्रवेश केला आहे यात त्याने इंडोनेशिया ओपन, ऑस्ट्रेलियन ओपन आणि डेन्मार्क ओपन सुपर सिरीज जिंकली आहे. जर तो फ्रेंच ओपन सुपर सिरीजही जिंकला तर तो या वर्षांत आत्तापर्यंत ४ विजेतीपदे मिळवेल.

या बरोबरच भारताची स्टार बॅडमिंटनपटू आणि ऑलिम्पिक रौप्य पदक विजेती पी. व्ही. सिंधूला काल उपांत्य सामन्यात पराभवाला सामोरे जावे लागले. तिला जपानच्या अकान यामागूचीने २१-१४, २१-९ असा सरळ सेटमध्ये हरवले. या आधीही यामागूचीनेच या स्पर्धेत भारताची बॅडमिंटनपटू सायना नेहवालला पराभूत करून तिचे आव्हान संपुष्टात आणले होते.

या स्पर्धेत एक छान गोष्ट बघायला मिळाली ती सिंधूकडून तिने तिचा पराभव झाल्यानंतरही श्रीकांत आणि प्रणॉयचा सामना बघायला हजेरी लावली तेव्हा तिने कोर्टवर सामना बघायला आलेल्या अनेक चाहत्यांना सेल्फी देऊन खुश केले.