अध्यक्षीय संघाविरूद्ध श्रीलंकेचा धावांचा डोंगर !

कोलकाता । येथे सुरु असलेल्या अध्यक्षीय संघ विरुद्ध श्रीलंका यांच्यातील दोन दिवसीय सराव सामन्यात श्रीलंका संघाने पहिल्या दिवसाखेर धावांचा डोंगर उभा केला आहे. श्रीलंका संघाने दिवसभरात ८८ षटकांत ६ बाद ४११ धावा केल्या.

श्रीलंकेकडून सदिरा समरविक्रमा (७५), दिमूथ करुणारत्ने (५०), अँजेलो मॅथ्यूज (५४) यांनी अर्धशतकी तर दिलरुवान परेरा (४८) धावा केल्या.

अध्यक्षीय संघाचे नेतृत्व संजू सॅम्सनने केले. या संघाकडून एकाही खेळाडूला विशेष चमक दाखवता आली नाही. संदीप वॉर्रीर (६०/२) आणि आकाश भंडारी (१११/२) यांनी विकेट्स घेतल्या.

१६ नोव्हेंबरपासून पहिला कसोटी सामना इडन गार्डन मैदानावर होणार आहे. त्यापूर्वी श्रीलंका संघाने फलंदाजीचा चांगलाच सराव केला.