दुसरी कसोटी: श्रीलंकेची पडझड सुरूच

कोलंबो: येथे सुरु असलेल्या श्रीलंका विरुद्ध भारत दुसऱ्या कसोटीच्या तिसऱ्या दिवशीही श्रीलंकेची पडझड सुरूच आहे. आज सकाळच्या सत्रात पहिल्या दीड तासात लंकेचे चार खेळाडू तंबूत परतले आहे.

आज दिनेश चंडिमल(१०), अँजेलो मॅथेवस(२६) धनंजया डी सिल्वा (०) आणि कुशल मेंडिस (२४), निरोशन डिकवेल्ला (५१) हे फलंदाज बाद झाले आहेत. भारतीय गोलंदाजात अश्विनने ३ जडेजाने २ उमेश यादव आणि मोहम्मद शमी यांनी प्रत्येकी १ विकेट घेतल्या आहेत.

निरोशन डिकवेल्लाने लंकेकडून एका बाजूने किल्ला लढवताना अर्धशतकी खेळी केली परंतु तोही मोठी धावसंख्या उभारण्यात अपयशी ठरला.

श्रीलंकेच्या सध्या ७ बाद १५० धावा झाल्या आहेत.