सृजन क्रिकेट करंडक स्पर्धेच्या चौथ्या सत्रास ११ डिसेंबर पासून प्रारंभ 

आज मुंढव्यातील लिजंड मैदानावर गौतम गंभीरच्या उपस्थितीत पुणे विभागाचा अंतिम सामना

पुणे: जिल्हा परीषद सदस्य रोहित पवार यांच्या पुढाकारातून ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून सुरू असलेल्या टेनिस बॉलवर खोळल्या जाणा-या सृजन करंडक क्रिकेट स्पर्धेच्या चौथ्या सत्राची ११ डिसेंबर पासून सुरूवात होणार आहे. तत्पूर्वी पुणे शहराचा अंतिम सामना ११ डिसेंबर रोजी मुंढव्यातील लिजंड मैदानावर होणार असून त्यास भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार गौतम गंभीर हजेरी लावणार आहे.

सृजनच्या चौथ्या सत्राची अंतिम फेरी ११ ते १६ डिसेंबर या दरम्यान होत आहे.

पुणे शहर, पिंपरी चिंचवडसह जिल्ह्यातील तब्बल ६०० संघ व ९ हजार खेळाडूंच्या सहभागाने भव्य स्वरुपात होत असलेल्या या स्पर्धेसाठी भारतीय क्रिकेट संघातील दिग्गज खेळाडू गौतम गंभीर येत्या ११ डिसेंबर रोजी मुंढव्याच्या मैदानावर हजेरी लावणार आहे. यावेळी गंभीर उपस्थित खेळाडूंना मार्गदर्शनही करणार आहे. त्याच्या निवृत्तीनंतरचा हा पहिलाच क्रिकेटपटूंना प्रोत्साहन देणारा सार्वजनिक सामना आहे. दरम्यान गौतम गंभीरच्या उपस्थितीमुळे क्रिकेटपटूंचा उत्साह चांगलाच दुणावला असून येत्या ११ डिसेंबर रोजी गंभीरच्या उपस्थितीत  उपांत्य फेरीतील सामने होतील.स्पर्धेतील सामने साखळी व बाद पध्दतीने होणार आहेत.

३२ संघ प्लेऑफमध्ये!
या स्पर्धेत 32 संघांनी प्ले ऑफ मध्ये प्रवेश केला आहे. यामध्ये ओम साई संघ (मुळशी), पै.सचिन भाडळे प्रतिष्ठान(शिरूर), श्रेयस इलेव्हन(खेड), नागेश्वर अकादमी(दौंड), सचिन भाऊ तकपुंदे प्रतिष्ठान(मावळ), स्वराज्य क्रिकेट क्लब(मावळ), यंगर्स क्रिकेट क्लब (बारामती), धायरी क्रिकेट क्लब (पुणे), शंभूराजे स्पोर्ट्स क्लब (मुळशी), राजगड वॉरियर्स 2(भोर), राजुरी क्रिकेट क्लब(जुन्नर), केटी फायटर मदनवाडी(इंदापुर), भैरवनाथ मित्र मंडळ(पुरंदर), कानिफनाथ क्रिकेट क्लब अ(पुरंदर), इलेव्हन स्टार बारामती 15 (बारामती) यांचा समावेश आहे.