सृजन करंडक स्पर्धेत ओम साई ग्रुप वातुंडे, रायझींग स्टार वडगावशेरी संघांचा विजय

पुणे ।पुणे जिल्हा परीषद सदस्य रोहित पवार यांच्या तर्फे आयोजित सृजन करंडक स्पर्धेत ओम साई ग्रुप वातुंडे संघाने राजुरी क्रिकेट क्लब जुन्नर संघाचा तर रायझींग स्टार वडगावशेरी संघाने के.टी फायटर्स मदनवाडी भिगवन संघाचा पराभव करत स्पर्धेत आगेकुच केली.

लेजेन्डस् क्रिकेट क्लब, मुंढवा येथे सुरू असलेल्या या स्पर्धेत किसन मरगळेच्या अष्टपैलू कामगिरीच्या जोरावर ओम साई ग्रुप वातुंडे संघाने राजुरी क्रिकेट क्लब जुन्नर संघाचा 46 धावांनी दणदणीत पराभव केला.

पहिल्यांदा खेळताना मोद कुदळेच्या 31, तेजस शिंदेच्या नाबाद 33 व किसन मरगळेच्या नाबाद 20 धावांसह ओम साई ग्रुप वातुंडे संघाने 6 षटकात 1 बाद 93 धावा केल्या. 93 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना किसन मरगळेच्या आक्रमक व भेदक गोलंदाजीपुढे राजुरी क्रिकेट क्लब जुन्नर संघ 6 षटकात 9 बाद 47 धावात गारद झाला.

किसन मरगळेने केवळ 7 धावा देत 5 गडी बाद करत संघाचा डाव सुरक्षीत केला. राजेंद्र पवार व प्रमोद कुदळे यांनी प्रत्येकी 2 गडी बाद करत संघाला विजय मिळवून दिला. किसन मरगळे सामनावीर ठरला.

दुस-या लढतीत नागेश पुजारीच्या अचूक गोलंदाजीच्या जोरावर रायझींग स्टार वडगावशेरी संघाने के.टी फायटर्स मदनवाडी भिगवन संघाचा 7 धावांनी पराभव केला.

स्पर्धेचा सविस्तर निकाल- साखळी फेरी
ओम साई ग्रुप वातुंडे- 6 षटकात 1 बाद 93 धावा(प्रमोद कुदळे 31, तेजस शिंदे नाबाद 33, किसन मरगळे नाबाद 20, वसिम चौगुले 1-44) वि.वि राजुरी क्रिकेट क्लब जुन्नर- 6 षटकात 9 बाद 47 धावा(सोहेल चौगुले 15, सोयेब पठान 15, किसन मरगळे 5-7, राजेंद्र पवार 2-8, प्रमोद कुदळे 2-29) सामनावीर- किसन मरगळे
ओम साई ग्रुप वातुंडे संघाने 46 धावांनी सामना जिंकला.

रायझींग स्टार वडगावशेरी- 6 षटकात 6 बाद 45 धावा(योगेश पुसाळ नाबाद 17, शफिक शेख 2-16, ऋषिकेश शिंदे 2-2, नितिन पवार 2-13) वि.वि के.टी फायटर्स मदनवाडी भिगवन- 6 षटकात 6 बाद 38 धावा(सोहेल सय्यद नाबाद 9, नागेश पुजारी 3-9, दिनेश वाडकर 1-14, प्रतिक शिंदे 1-10) सामनावीर- नागेश पुजारी
रायझींग स्टार वडगावशेरी संघाने 7 धावांनी सामना जिंकला.