मौका मौका ते सबसे बडा मोह

सर्व भारतीय क्रिकेटरसिकांना स्टार स्पोर्ट्स या वाहिनीने २०१५ च्या विश्व्चषकासाठी केलेली ‘मौका मौका’ ही जाहिरात नक्कीच लक्षात असेल. ही जाहिरात सर्वाना इतकी आवडली की १२ तासातच या जहिरातीला १० लाख लोकांनी पाहिले. या जाहिरातीला फेसबुकवर ६३ लाख आणि ट्विटर ११ लाख जणांनी लाईक केले आहे. आता १ वर्षनंतर भारत पाकिस्तान या कट्टर प्रतिस्पर्धीनचा सामना ४ जूनला होणार असून सर्व क्रिकेट रसिकांचे लक्ष या सामन्याकडे लागून आहे.

स्टार स्पोर्ट्सने चॅम्पियनस ट्रॉफीच्या प्रमोशनसाठी आजवर काढलेल्या जाहिरातीत ‘वही वर्ल्डकप वली फिलिंग’, ‘हर कोई देखेगा’, आणि ‘मातृभाषा’ अश्या जाहिरातींचा समावेश आहे. स्टार स्पोर्ट्स ने पुन्हा एकदा एक नवीन जाहिरात फक्त भारत आणि पाकिस्तानच्या चॅम्पियन्स ट्रॉफीमधल्या सामन्यासाठी काढली आहे. #SabseBadaMoh असा हॅशटॅग ही त्यांनी वापरला आहे.

 

 

या जाहिरातीत एक तरुण यशस्वी बिझनेसमॅन दाखवला आहे, जो सर्व मोह त्यागून एका योग्याकडे सन्यास घेण्यासाठी जातो आणि तिथे गेल्यावर त्याला समजते की ४ तारखेला भारत पाकिस्तानचा चॅम्पियन्स ट्रॉफीचा सामना होणार आहे. मग त्याला हा सामना बघायचा मोह आवरत नाही आणि तो तिथून पळून जातो. या जाहिरातीला आता पर्यंत ६ लाख लोकांनी पहिले आहे.

चॅम्पियन्स ट्रॉफी या एकमेव आयसीसी स्पर्धेमध्ये भारताला पाकिस्तानकडून हार पत्करावी लागली आहे. २०१३च्या चॅम्पियन्स ट्रॉफीचा भारत विजेता आहे आणि त्या वर्षी भारतने त्या स्पर्धेत एकही सामना न गमावण्याचा विक्रम देखील केला होता. आता पाहुयात ४ जूनच्या सामन्यात कोण ‘मौका मौका’ करते ते.

 

पहा कशी आहे नवीन जाहिरात:

https://www.youtube.com/watch?time_continue=19&v=22HKItbJLsw