रणजी ट्रॉफीच्या पहिल्या फेरीतील हे विक्रम क्रिकेटप्रेमींना माहित हवेच !

पहिल्या फेरीच्या समाप्तीनंतर ८४व्या रणजी ट्रॉफीमध्ये सौराष्ट्र, केरळ, रेल्वे आणि मध्यप्रदेश राज्य सामने जिंकले आहेत. याच फेरीत आपण हिमाचल प्रदेशच्या प्रशांत पांचाळने त्रिशतकी खेळी केली. हिमाचल प्रदेशाकडून ही रणजी ट्रॉफीसाठी सर्वोच्च खेळी केली आहे.

या फेरीतील ही खास आकडेवारी-
– ३३८ ही रणजी ट्रॉफीमधील १०वी सर्वोच्च खेळी आहे. भाऊसाहेब निंबाळकर यांनी १९४८/४९ साली नाबाद ४४३ ही सर्वोच्च खेळी केली होती.

– केवळ दुसऱ्यांदा १०० किंवा त्यापेक्षा कमी धावांचे लक्ष चौथ्या डावात असतानाही पाठलाग करणारा संघ अयशस्वी झाला/

-युसूफ पठाण हा केवळ बडोद्याचा ६वा खेळाडू ठरला आहे ज्याने रणजी ट्रॉफी सामन्यात दोंन्ही डावात शतकी खेळी केल्या आहेत.

-युसूफ पठाणने कालच्या सामन्यात तब्बल १३ षटकार मारले आहेत. एका रणजी सामन्यात सर्वाधिक षटकार मारणाऱ्या खेळाडूंच्या यादीत तो तिसरा आहे.

-केवळ तिसऱ्यांदा जम्मू-काश्मीर संघाच्या ५ खेळाडूंनी पहिल्या डावात अर्धशतकी खेळी केल्या.