राज्य अजिंक्यपद बॉक्सिंग स्पर्धा: अनिकेत, मोहसीन, आकाश उपांत्य फेरीत

पुणे। पुण्याच्या अनिकेत खोमणे, मोहसीन सय्यद आणि आकाश गोरखा यांनी आपापल्या प्रतिस्पर्ध्यावर मात करून पुणे जिल्हा परिषदेचे सदस्य व बारामती अग्रो कंपनीचे कार्यकारी संचालक रोहित पवार आणि पुणे शहर बॉक्सिंग असोसिएसन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित माजी कृषीमंत्री पद्मविभूषण शरदचंद्रजी पवार यांच्या वाढदिवसानिमित्त होणा-या १९ वर्षांखालील गटाच्या सृजन करंडक राज्य अजिंक्यपद बॉक्सिंग स्पर्धेच्या उपांत्य फेरीत प्रवेश केला.

भवानी पेठेतील जनरल अरुणकुमार वैद्य स्टेडियम येथे ही स्पर्धा सुरू आहे. स्पर्धेतील ५२ किलो मुलांच्या गटातील उपांत्यपूर्व फेरीत पुणे जिल्ह्याच्या अनिकेत खोमणेने सांगली जिल्ह्याच्या दीप कांबळेवर ३-०ने मात केली. याच गटात पुणे शहरच्या मोहसीन सय्यदने अकोला शहरच्या प्रतीक शिंदेवर विजय मिळवून उपांत्य फेरीतील प्रवेश निश्चित केला.

स्पर्धेतील ५६ किलो गटात पुणे शहरच्या आकाश गोरखाने क्रीडापीठाच्या प्रणय राऊतवर ३-०ने मात करून आगेकूच केली. स्पर्धेतील ५४ किलो मुलींच्या गटात पुणे शहरच्या आर्या कुलकर्णीने पुणे जिल्ह्याच्या तेजल पवारवर मात करून आगेकूच केली. यानंतर ६० किलो मुलींच्या गटात पुणे शहरच्या ऋतुजा काळेने मुंबई जिल्हाच्या मरी यादववर वर्चस्व राखले.

निकाल – उपांत्यपूर्व फेरी –

४८ किलो मुली – यशश्री धनावडे (सातारा जिल्हा) वि. वि. योगिता परदेशी (पुणे शहर), दिशा पाटील (सांगली जिल्हा) वि. वि. जान्हवी वाघमारे (मुंबई जिल्हा), प्रज्ञा शिंदे (जळगाव जिल्हा) वि. वि. आराधना संजय (पालघर जिल्हा)

५१ किलो मुली – पल्लवी खोत (कोल्हापूर जिल्हा) वि. वि. सौंदर्या कट्टा (मुंबई शहर), गीता बासगी (सातारा जिल्हा) वि. वि. निकिता गाडगीळ (कोल्हापूर शहर), स्नेहल तुपे (औरंगाबाद शहर) वि. वि. तनया वानखेडे (अकोला शहर), गायत्री पाटील (रायगड जिल्हा) वि. वि. दीक्षा लोंढे (नाशिक शहर)

५४ किलो मुली – प्राजक्ता शिंदे (धुळे) वि. वि. मानसीसिंग (रायगड जिल्हा), पूर्वा राऊत (मुंबई जिल्हा) वि. वि. वैशाली नाडेकर (नाशिक जिल्हा), दिव्या अनिल (पालघर जिल्हा) वि. वि. शीतल कोळपे (सातारा जिल्हा)

५७ किलो मुली – प्राचली मोकाटे (अहमदनगर जिल्हा) वि. वि. अमृता हंजुरा (नागपूर शहर), ऋतुजा जाधव (औरंगाबाद शहर) वि. वि. समृद्धी जगदाळे (पुणे शहर), साक्षी केदारजी (सातारा जिल्हा) वि. वि. आकांक्षा घुले (पिंपरी-चिंचवड).

६० किलो मुली – कीर्ती तरारे (नागपूर शहर) वि. वि. दीक्षिता पारटोले (ठाणे जिल्हा).

६९ किलो मुली – चैत्राली बुरांडे (सोलापूर जिल्हा) वि. वि. मेघा फडतरे (सातारा जिल्हा).

५२ किलो मुले – प्रनेश फणसे (मुंबई उपनगर) वि. वि. शुभम जाधव (सातारा जिल्हा), नाना पिसाळ (क्रीडापीठ) वि. वि. यश पाटील (ठाणे जिल्हा).

५६ किलो मुले – अरुण गुप्ता (जळगाव जिल्हा) वि. वि. कासिम रझाउद्दीन (पालघर जिल्हा), शुभमसिंग (ठाणे जिल्हा) वि. वि. अजय चौधरी (नंदुरबार जिल्हा), अब्दुल अन्सारी (मुंबई उपनगर) वि. वि. शशांक पगारे (पिंपरी चिंचवड).

६० किलो मुले – राज तायडे (क्रीडापीठ) वि. वि. श्रीकांत भागवत (सोलापूर जिल्हा), सागर अढळे (जळगाव जिल्हा) वि. वि. प्रसाद बुते (नाशिक शहर), मुवाजम शेख (पुणे शहर) वि. वि. कृष्णत पाटील (सांगली जिल्हा),साकेत मोरे (मुंबई जिल्हा) वि. वि. शुभम भालेराव (ठाणे जिल्हा).

६४ किलो मुले – सुजित माळी (सांगली जिल्हा) वि. वि. प्रतीक गोडगे (पिंपरी-चिंचवड),ताहेर इनामदार (पुणे शहर) वि. वि. संकेत मुटकुरे (नागपूर शहर), केशव हन्स (पुणे जिल्हा) वि. वि. तेजस कर्णेकर (मुंबई जिल्हा), स्वप्नील साळवी (सातारा जिल्हा) वि. वि.सोहेल पप्पूवाले (क्रीडापीठ).

६९ किलो मुले – अर्जुन तोमर (औरंगाबाद शहर) वि. वि. अभयजित तिवारी (अकोला शहर), अमिश पंडितवार (नागपूर शहर) वि. वि. अथर्व कदम (पुणे शहर), शुभम कुसुरकर (सोलापूर जिल्हा) वि. वि. प्रथम जैव (मुंबई जिल्हा), दीपक जाधव (क्रीडापीठ) वि. वि. बुद्धभूषण निकम (जळगाव जिल्हा).

७५ किलो मुले – अभय तावरे (नंदुरबार जिल्हा) वि. वि. शुभम वाणे (औरंगाबाद जिल्हा), पृथ्वीराज इवाव्हरे (सातारा जिल्हा) वि. वि. अक्षय वाघमारे (पिंपरी-चिंचवड),गणेश बाजपेई (मुंबई जिल्हा) वि. वि. अजित साळुंखे (सोलापूर जिल्हा), साहिल जाधव (पुणे शहर) वि. वि. यासिर पठाण (अहमदनगर जिल्हा).

९१ किलो मुले – अब्दुल रझिक खान (अहमदनगर जिल्हा) वि. वि. शुभम सिद्दगवळी (सांगली जिल्हा), नूर शेख (नाशिक शहर) वि. वि. सचिन शेख (पुणे जिल्हा).