राज्य अजिंक्यपद बॉक्सिंग स्पर्धा: अनिकेत, मोहसीन, योगिताची विजयी सलामी

पुणे। पुण्याच्या अनिकेत खोमणे, मोहसीन सय्यद, योगिता परदेशी यांनी पुणे जिल्हा परिषदेचे सदस्य व बारामती अ‍ॅग्रो कंपनीचे कार्यकारी संचालक रोहित पवार आणि पुणे शहर बॉक्सिंग असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित माजी कृषीमंत्री पद्मविभूषण शरदचंद्रजी पवार यांच्या वाढदिवसानिमित्त होणा-या सृजन करंडक १९ वर्षांखालील गटाच्या महाराष्ट्र राज्य अजिंक्यपद बॉक्सिंग स्पर्धेत आपापल्या प्रतिस्पर्ध्यावर मात केली.

भवानी पेठेतील जनरल अरुणकुमार वैद्य स्टेडियम येथे ही स्पर्धा सुरू आहे. स्पर्धेतील ५२ किलो मुलांच्या गटातील दुस-या फेरीत पुणे जिल्ह्याच्या अनिकेत खोमणे याने नाशिक जिल्ह्याच्या तुषार जाधववर वर्चस्व राखले. अनिकेत आक्रमक खेळासमोर तुषारचा निभाव लागत नव्हता. म्हणून लगेचच पंचांनी लढत थांबवून अनिकेतला विजयी घोषित केले. यानंतर याच गटात पुणे शहरच्या मोहसीन सय्यद याने सोलापूर जिल्ह्याच्या राष्ट्रपाल गाडेवर गुणांवर मात केली.

स्पर्धेतील ५६ किलो मुलांच्या गटात क्रीडापीठच्या प्रणय राऊतने पुणे जिल्ह्याच्या अभिजित कांबळेवर २-०ने मात केली. या गटात पुणे शहरच्या आकाश गोरखाने सांगली जिल्ह्याच्या अजय सावंतचे आव्हान परतवून लावून आगेकूच केली. स्पर्धेतील ६० किलो मुलांच्या गटात पुणे शहरच्या मुवाजम शेखने पुणे जिल्ह्याच्या रोहन पांडेरेवर ५-०ने विजय मिळवला आणि आगेकूच केली. यानंतर स्पर्धेतील ४८किलो मुलींच्या गटातील पहिल्या फेरीत पुणे शहरच्या योगिता परदेशीने वर्धा जिल्ह्याच्या प्रतीक्षा पारछकेवर ५-२ असा सहज विजय मिळवला.

निकाल –

दुसरी फेरी – ५२ किलो मुले – प्रनेश फनसे (मुंबई उपनगर) वि. वि. श्याम जयराम (पालघर जिल्हा), शुभम जाधव (सातारा जिल्हा) वि. वि. सांदल मोने (अमरावती जिल्हा), दीप कांबळे (सांगली जिल्हा) वि. वि. रुद्रेश वरकड (औरंगाबाद जिल्हा), प्रतीक शिंदे (अकोला शहर) वि. वि. ऋषीकेश गिरी (बीड), नाना पिसाळ (क्रीडापीठ) वि. वि. गणेश पडवळ (कोल्हापूर जिल्हा), यश पाटील (ठाणे जिल्हा) वि. वि. देवेंद्रसिंग दामडे (जळगाव जिल्हा).

५६ किलो मुले – अरुण गुप्ता (जळगाव जिल्हा) वि. वि. विशाल पाठक (अकोला शहर), कासिम रझाउद्दीन (पालघर जिल्हा) वि. वि. प्रथमेश चेंडके (औरंगाबाद जिल्हा), अजय चौधरी (नंदुरबार जिल्हा) वि. वि. आर्यन निकम (मुंबई जिल्हा), शुभम सिंग (ठाणे जिल्हा) वि. वि. प्रवीण पाटील (कोल्हापूर जिल्हा), अब्दुल अन्सारी (मुंबई उपनगर) वि. वि. विक्रांत सुपेकर (औरंगाबाद शहर), शशांक पगारे (पिंपरी चिंचवड) वि. वि. निशांतसिंग (रायगड जिल्हा).

६० किलो मुले – कृष्णकांत भागवत (सोलापूर जिल्हा) वि. वि. तुषार चव्हाण (कोल्हापूर जिल्हा), राज तायडे (क्रीडापीठ) वि. वि. राहुल महाले (नाशिक जिल्हा), प्रसाद बुते (नाशिक शहर) वि. वि. राजदीप राय (औरंगाबाद जिल्हा), सागर अढळे (जळगाव जिल्हा) वि. वि. प्रसाद काशीद (सातारा जिल्हा).

४९ किलो मुले – साहिल शेख (पुणे शहर) वि. वि. पवन साळवे (जळगाव जिल्हा), आकाश माळी (नंदुरबार जिल्हा) वि. वि. संदेश काटकर (कोल्हापूर जिल्हा), मुकुल शिंदे (सातारा जिल्हा) वि. वि. श्रेयस कांबळे (सांगली जिल्हा), शिवाजी गेदाम (क्रीडापीठ) वि. वि. विशाल देवीराम (पालघर जिल्हा)

८१ किलो मुले – इंद्रजित सोरटे (पिंपरी-चिंचवड) वि. वि. साहिल शेख (पुणे शहर), सूरज शिरसाठ (धुळे जिल्हा) वि. वि. संकेत पवार (सातारा जिल्हा), स्वप्नील गवळी (पुणे जिल्हा) वि. वि. महंमद तुकीर (अकोला शहर).

पहिली फेरी – ४८ किलो मुली – प्रज्ञा शिंदे (जळगाव जिल्हा) वि. वि. रुचिता कनोजिया (मुंबई उपनगर), गौरी जयसिंगपुरे (अकोला शहर) वि. वि. निकिता लोखंडे (नाशिक जिल्हा), यश्श्री धनावडे (सातारा जिल्हा) वि. वि. काजल बिले (सोलापूर जिल्हा), जान्हवी वाघारे (मुंबई जिल्हा) वि. वि. मिनाझ शेख (पुणे जिल्हा), दिशा पाटील (सांगली जिल्हा), स्नेहल तावरे (पिंपरी चिंचवड), आराधना संजय (पालघर जिल्हा) वि. वि. निकिता पवार (बीड).

सौंदर्या कट्टा (मुंबई शहर) वि. वि. प्रिया जाधव (नाशिक जिल्हा), पल्लवी खोत (कोल्हापूर जिल्हा) वि. वि. आकांक्षा मेरगू (अहमदनगर जिल्हा), निकिता गाडगीळ (कोल्हापूर जिल्हा) वि. वि. आयेशा सय्यद (मुंबई जिल्हा), गीता बासगी (सातारा जिल्हा) वि. वि. नंदिनी ओझा (मुंबई उपनगर), गायत्री पाटील (रायगड जिल्हा) वि. वि. हर्षद राऊत (पुणे शहर), दीक्षा लोंढे (नाशिक सिटी) वि. वि. सायली शिंदे (पुणे जिल्हा).