राज्य अजिंक्यपद बॉक्सिंग स्पर्धेला जल्लोषात सुरुवात, प्रतीक, ताहेर, केशवची विजयी सलामी

पुणे । पुण्याच्या प्रतीक गोडगे, ताहेर इनामदार, केशव हन्स यांनी पुणे जिल्हा परिषदेचे सदस्य व बारामती अ‍ॅग्रो कंपनीचे कार्यकारी संचालक रोहित पवार आणि पुणे शहर बॉक्सिंग असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित सृजन करंडक १९ वर्षांखालील गटाच्या राज्य अजिंक्यपद बॉक्सिंग स्पर्धेत आपापल्या प्रतिस्पर्ध्यावर मात करून विजयी सलामी दिली.

भवानी पेठेतील जनरल अरुणकुमार वैद्य स्टेडियम येथे ही स्पर्धा सुरू आहे. स्पर्धेचे उद्घघाटन पुणे शहर बॉक्सिंग असोसिएशनचे अध्यक्ष व माजी गृहराज्यमंत्री रमेश बागवे, नगरसेवक अविनाश बागवे यांच्या हस्ते झाले. या वेळी अर्जुन पुरस्कार विजेते मनोज पिंगळे, छत्रपती पुरस्कार विजेते विजय यादव, राष्ट्रीय कॉँग्रेसचे शशिकांत तापकीर, विपुल म्हैसकर, संतोष नागरे, गणेश नलावडे, मृणाली वाणी, भरत व्हावळ, स्पर्धेचे व्यवस्थापक मदन वाणी आदी मान्यवर उपस्थित होते.

या स्पर्धेतील ६४ किलो मुलांच्या गटात पिंपरी-चिंचवडच्या प्रतीक गोडगेने मुंबई उपनगरच्या ओजश्वी यादववर गुणांवर मात केली. यानंतर पुणे शहरच्या ताहेर इनामदारने औरंगाबादच्या कौस्तुभ केदारवर गुणांवर मात केली. पुणे जिल्ह्याच्या केशव हन्सने जळगाव जिल्ह्याच्या सिद्धार्थ सपकाळेवर गुणांवर मात केली. स्पर्धेतील ५२ किलो मुलांच्या गटात पुणे शहरच्या मोहसिन सय्यदने औरंगाबाद शहरच्या अक्षित मोहतुरेवर विजय मिळवला. मोहसिनच्या आक्रमक खेळासमोर अक्षितचा निभाव लागला नाही.त्यामुळे पंचांना ही लढत थांबवून मोहसिनला विजयी घोषित करण्यात आले.

स्पर्धेतील ५६ किलो गटात पिंपरी-चिंचवडचा शशांक पगारे असाच आपल्या प्रतिस्पर्ध्यावर वरचढ ठरला. त्याने अहमदनगरच्या गणेश बोकरेला संधीच दिली नाही. अखेर पंचांना ही लढत थांबवून शशांकला विजयी घोषित क रण्यात आले. स्पर्धेतील ४९ किलो गटात अकोला शहरच्या आदित्य दंडीने पुणे शहरच्या साहिल शेखचे आव्हान ३-०ने परतवून लावले. यानंतर नंदुरबारच्या अक्षय माळीने पुणे जिल्ह्याच्या तन्मय दाभाडेवर निर्विवाद वर्चस्व राखले.

निकाल – ४९ किलो मुले – पवन साळवे (जळगाव जिल्हा) वि. वि. शुभम नवघरे (नाशिक जिल्हा), संदेश काटकर (कोल्हापूर जिल्हा) वि. वि. महंमद रिझवान अन्सारी (मुंबई जिल्हा), श्रेयस कांबळे (सांगली जिल्हा) वि. वि. गौरव जाधव (कोल्हापूर शहर), मुकुल शिंदे (सातारा जिल्हा) वि. वि. मीर पगार (अहमदनगर जिल्हा), विशाल देवीराम (पालघर जिल्हा) वि. वि. सिद्धार्थ उपाध्यय (मुंबई उपनगर), शिवाजी गेदाम (क्रीडापीठ) वि. वि. सुभान नझीरहुसेन (सांगली शहर).

५२ किलो मुले – गणेश पडवळ (कोल्हापूर जिल्हा) वि. वि. ऋत्विक लोखंडे (चंद्रपूर), नाना पिसाळ (क्रीडापीठ) वि. वि. महंमद अमीर शेख (मुंबई जिल्हा), यश पाटील (ठाणे जिल्हा) वि. वि. प्रथमेश मराठे (नंदुरबार जिल्हा), देवेंद्रसिंह दामडे (जळगाव जिल्हा) वि. वि. प्रतीक नाबगे (अहमदनगर जिल्हा).

५६ किलो मुले – विक्रांत सुपेकर (औरंगाबाद शहर) वि. वि. रणवीर महाडिक (सोलापूर जिल्हा), अब्दुल अन्सारी (मुंबई उपनगर) वि. वि. रोहित अटोळे (सातारा जिल्हा), निशांतसिंग (रायगड जिल्हा) वि. वि. राहुल अलाने (बीड).

६० किलो मुले – शुभम भालेराव (ठाणे जिल्हा) वि. वि. प्रथमेश वाघमारे (अहमदनगर जिल्हा).

६४ किलो मुले – सुजित माळी (सांगली जिल्हा) वि. वि. उत्कर्ष कडू (नाशिक जिल्हा), संकेत मुटकुरे (नागपूर सिटी) वि. वि. अल्पेश यादव (धुळे जिल्हा), तेजस कर्णेकर (मुंबई जिल्हा) वि. वि. गणराज कुवर (नंदुरबार जिल्हा), स्वप्नील साळवी (सातारा जिल्हा) वि. वि. फरदिन खान (अहमदनगर जिल्हा), सोहेल पप्पूवाले (क्रीडापीठ) वि. वि. सूरज शिंदे (लातूर जिल्हा), शुभम कुसुरकर (सोलापूर जिल्हा) वि. वि. प्रज्वल पाटील (सांगली जिल्हा), बुद्धभूषण निकम (जळगाव जिल्हा) वि. वि. प्रसाद जाधव (अहमदनगर जिल्हा), दीपक जाधव (क्रीडापीठ) वि. वि. अथर्व लाड (नाशिक जिल्हा).

९१ किलोवरील मुले – नूर महंमद शेख (नाशिक शहर) वि. वि. अक्षित सकदसारिया (मुंबई उपनगर).