देवगडमध्ये रंगणार राज्यस्तरीय पुरुष व महिला कबड्डी स्पर्धांचा थरार

महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशनच्या मान्यतेने व सिंधुदुर्ग कबड्डी फेडरेअशन व देवगड तालुका कबड्डी असोसिएशनच्या सहकार्याने जामसंडे सन्मित्र मंडळ, जामसंडे तालुका देवगड जिल्हा सिंधुदुर्ग आयोजित पुरुष व महिला (निमंत्रित संघ) राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धाचा १७ ते १९ जानेवारी दरम्यान आयोजन करण्यात आले आहे.

“माजी आमदार कै. आप्पासाहेब गोगटे स्मृतीचषक” या नावाने जामसंडे सन्मित्र मंडळ, जामसंडे तालुका देवगड यांनी यास्पर्धेचा आयोजन केल आहे. गेली १२ वर्ष हे मंडळ कबड्डी स्पर्धांच आयोजन करत आहे.

यास्पर्धेला कबड्डी रसिकांसाठी सुसज्ज अशी ३,००० क्षमतेची प्रेक्षक गॅलरी बनवण्यात येणार आहे. तसेच व्हीआयपीसाठी वेगळी गॅलरी उभारण्यात येणार आहे. स्पर्धेतील विजेतासह वैयक्तिक स्वरूपाची रोख बक्षिसे, चषक व प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. प्रत्येक सामन्यात उत्कृष्ट खेळाडूस रोख रक्कम २,००० रुपये देण्यात येणार आहे.

कबड्डी स्पर्धेत एकूण पुरुषांचे १२ तर महिलांचे १२ संघ सहभागी होणार असून आधी साखळी सामने त्यानंतर बादफेरीचे सामने खेळवण्यात येतील. मातीच्या ४ मैदानावर सामने खेळवण्यात येणार असून सायंकाळी ५ वाजता सामने सुरू होतील.

स्पर्धा आयोजक- “जामसंडे सन्मित्र मंडळ, जामसंडे तालुका देवगड, जिल्हा सिंधुदुर्ग हे यास्पर्धेचे आयोजक आहेत.

स्पर्धाचा कालावधी- या राज्यस्तरीय पुरुष व महिला (निमंत्रित संघ) कबड्डी स्पर्धेचे आयोजन १७ जानेवारी ते १९ जानेवारी दरम्यान तीन दिवस करण्यात आले आहे. सामने सायंकाळ सत्रात मातीच्या मैदानावर खेळवण्यात येतील.

स्पर्धाचे ठिकाण- इंदिराबाई ठाकूर क्रीडानगरी, जामसंडे, तालुका देवगड, जिल्हा सिंधुदुर्ग

स्पर्धेत सहभागी संघ- यास्पर्धेसाठी राज्यातून मुंबई शहर, मुंबई उपनगर, ठाणे, पालघर, रायगड, सांगली, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, पुणे आदी जिल्ह्यातील एकूण १२ पुरुषांचे व १२ महिलांचे सहभागी होणार आहेत.

पुरूष संघ – अंकुर स्पोर्ट्स क्लब, विजय बजरंग व्या. शाळा, जय भारत, उत्कर्ष, उपनगर, अंबिका, उपनगर, शिवशंकर ठाणे, ओम कल्याण, नवभारत, शिरोळी, छावा, कोल्हापूर, सिंधुपुत्र, कोळोशी, सिंधुदूर्ग बॉईज, दोस्ती क्रीडा मंडळ रत्नागिरी.

महीला संघ –अंकुर, शिवशक्ती, संजीवनी उपनगर, सत्यम, स्वराज्य, होतकरु, ठाणे,कुर्लाई पालघर, अनिकेत रत्नागिरी, देवरूख स्पोर्ट, देवरुख, बाचणी कोल्हापूर, सिंधु स्पोर्ट कुडाळ, हॉली क्रॉस, सावंतवाडी

महत्त्वाच्या बातम्या-

आजपासून घाटकोपरमध्ये कबड्डीचा महाकुंभ, घाटकोपर कबड्डी प्रीमियर लीग…

क्रीडाविश्वाचा चेहरामोहरा बदलू पाहणाऱ्या पुण्यातील खेलो इंडिया गेम्सची अशी असणार रूपरेषा