तिसऱ्या कसोटी सामन्यापूर्वी येथे फिरोजशाह कोटलावरील ही आकडेवारी आपल्याला माहित आहे का? 

दिल्ली । उदयपासून भारत विरुद्ध श्रीलंका यांच्यातील तिसरा आणि शेवटचा कसोटी सामना येथे सुरु होत आहे. भारताने मालिकेत १-० अशी आघडी घेतली आहे.  उद्यापासून सुरु होणारा सामना जिंकून भारत मालिकेत २-० असा विजय मिळवण्यासाठी उत्सुक आहे. 

तत्पूर्वी फिरोजशाह कोटला मैदानावरील काही विक्रम आपणास नक्की माहित हवे. ते विक्रम असे

– भारतीय संघ या मैदानावर १३ कसोटी सामने जिंकला आहे तर ६ सामने पराभूत झाला आहे. भारत या मैदानावर एकूण ३३ सामने खेळला असून त्यातील ११ ड्रॉ राहिले आहेत. 

-भारतात केवळ चेन्नई येथील चिन्नास्वामी मैदानावर भारतीय संघ फिरोजशाह कोटला मैदनापेक्षा जास्त सामने जिंकला आहे. चेन्नई येथे भारतीय संघ ३३ पैकी १४ सामने जिंकला आहे. 

-भारतीय संघ १९८८ नंतर येथे ११ कसोटी सामने खेळला असून त्यात १० सामन्यात संघाने विजय मिळवला आहे. तर एक सामना ड्रॉ राहिला आहे. 

-भारतीय संघ १९८७ पर्यंत येथे २२ सामने खेळला होता त्यात केवळ ३ विजय तर ६ पराभव भारताला पाहावे लागले होते. १३ सामने ड्रॉ राहिले होते. 

-आजपर्यंत या मैदानावर फिरकी गोलंदाजांनी ५०३ तर वेगवान गोलंदाजांनी ३६८ विकेट्स घेतल्या आहेत. 

– या मैदानावर एका डावात सर्वाधिक धावा ८ बाद ६४४ विंडीजने भारताविरुद्ध १९५९ केल्या होत्या. 

-१९८७ साली भारतीय संघ या मैदानावर ७५ धावांत बाद झाला होता. ही या मैदानावरील कसोटी डावातील नीचांकी धावसंख्या आहे.