आजच्या वनडे सामन्यात होणार दक्षिण आफ्रिकेविरुद्ध ५ मोठे विक्रम

सेंच्युरीन | भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका वनडे सामन्यात आज अनेक विक्रम होण्याची शक्यता आहे. भारत विरुद्द दक्षिण अफ्रिका मालिकेतील हा ७वा सामना असुन भारताला परदेशात प्रथमच द्विपक्षिय मालिकेत ५ सामने जिंकण्याची संधी अाहे. 

हा सामना येथील न्यू वंडर्स स्टेडीयमवर होणार आहे. भारतीय संघ मालिकेत ४-१ असा आघाडीवर आहे. या सामन्यात अनेक विक्रम होवू शकतात. ते असे-

१.  वनडेत कोहलीला ९५०० धावा करण्यासाठी ४१ धावांची गरज. त्याने अाजपर्यंत २०७ वनडेत ९४५९ धावा केल्या आहेत. 

२. अजिंक्य रहानेला वनडेत ३००० धावा करण्यासाठी ७२ धावांची गरज, त्याने ८० वनडेत २९२८ धावा केल्या आहेत. 

३. एम एस धोनीला वनडेत १०,००० धावा करण्यासाठी ३३ धावांची गरज, त्याने ३१७ वनडेत ९९६७ धावा केल्या आहेत. 

४. विराटला प्रथमच वनडेत एबी डीव्हिलिअर्सपेक्षा जास्त धावा करण्याठी ८९ धावांची गरज. विराटने वनडेत २००८ तर एबीने २००५ साली वनडेत  पदार्पण केले होते. 

५. भारताच्या टाॅप आॅर्डरने मिळून २०१५ विश्वचषकानंतर ८९१४ धावा केल्या आहेत.  त्यांना ९००० धावा करण्यासाठी केवळ ८६ धावांची गरज. या यादीत दुसऱ्या स्थानी इंग्लडचा संघ असून त्यांनी ७०३९ धावा केल्या आहेत.