वाचा: चेपॉक मैदानाचा इतिहास कुणाच्या बाजूने?

चेन्नई । रविवार, १७ सप्टेंबर रोजी भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यातील ५ वनडे सामन्यातील पहिला सामना एमए चिदंबरम स्टेडियम, चेपॉक,चेन्नई येथे होणार आहे. भारतीय क्रिकेट संघ सध्या जबरदस्त फॉर्ममध्ये असून आपले विजयी अभियान सुरु ठेवण्यासाठी प्रयत्न करेल.

जगातील सार्वधिक लांबीचा दुसरा क्रमांकावरील समुद्र किनारा असलेल्या मरिना बीच पासून अगदी हाकेच्या अंतरावर हे मैदान आहे. तिथे असणाऱ्या रेल्वे स्टेशनला देखील चेपॉक स्टेशन असेच नाव आहे. अतिशय मोठा क्रिकेट चाहता वर्ग असलेलं शहर म्हणजे चेन्नई. अगदी काही तासात पहिल्या सामन्याचे अतिशय महागडे तिकिटे संपली.

या सामन्याची मोठ्या प्रमाणावर चर्चा आहे. अगदी चाहते, समालोचक, माजी खेळाडू सर्वजण या सामन्याची चर्चा करत आहे. मग आपणही थोडी या मैदानावरील विक्रमांची आकडेवारी कुणाच्या बाजूने आहे हे पहिले पाहिजे. त्याच आकडेवारीचा हा लेखाजोखा-

#१ या मैदानावर भारतीय संघ ११ सामने खेळला असून त्यातील ६ सामन्यात विजय तर ४ सामन्यात भारताचा परबहाव झाला आहे. १ सामन्यात निकाल लागला नाही.

#२ या मैदानावर ऑस्ट्रेलिया संघ एकही सामना आजपर्यत हरला नाही. ४ पैकी ४ सामन्यात ऑस्ट्रेलियाने येथे विजय मिळवला आहे.

#३ भारताने ऑस्ट्रेलिया संघाविरुद्ध येथे एक सामना खेळला असून त्यात भारतीय संघ पराभूत झाला आहे. १९८७ साली ऑस्ट्रेलिया संघाने भारतावर एका धावेने विजय मिळवला होता.

#४ या मैदानावर सर्वाधिक वनडे धावा भारताकडून विराट कोहलीने केल्या आहेत. त्याने ५ सामन्यात २७९ धावा केल्या आहेत. युवराज सिंग (१९६) आणि सचिन तेंडुलकर (१९०) हे दुसऱ्या आणि तिसऱ्या क्रमांकावर आहेत.

#५ या मैदानावर वनडेमध्ये खेळताना धोनीने भारत आणि आशिया अशा दोन संघांकडून खेळताना तब्बल ३२२ धावा केल्या आहेत तर युवराज सिंगनेही २५७ धावा केल्या आहेत.

#६ ऑस्ट्रेलियाकडून जेफ मार्श यांनी या मैदानावर ३ सामन्यात २४६ धावा केल्या आहेत.