भारतीय संघाच्या पराभवानंतरही हे विक्रम झाले

बेंगलोर । भारतीय संघ ऑस्ट्रेलिया विरुद्ध २१ धावांनी पराभूत झाल्यामुळे याचा मोठा फटका भारतीय संघाला बसला आहे. भारतीय संघाची आयसीसी वनडे क्रमवारीत पहिल्या स्थानावरून दुसऱ्या स्थानावर घसरण झाली.

असे असले तरी या सामन्यातही अनेक विक्रम झाले ते असे:

# गेल्या १३ सामन्यात परदेशी भूमीवर विजय मिळवण्यात अपयश आलेल्या ऑस्ट्रेलिया संघाला पहिला विजय मिळाला.

# ऑस्ट्रेलिया संघाची चिन्नास्वामी स्टेडियमवरील भारताविरुद्धची ही दुसरी मोठी धावसंख्या

# ऑस्ट्रेलियाने ४थ्यांदा चिन्नास्वामी स्टेडियमवर ३०० किंवा त्यापेक्षा जास्त धावा केल्या आहेत.

# उमेश यादवने वनडेत १०० विकेट्स घेतल्या. अशी कामगिरी करणारा तो ११वा भारतीय खेळाडू बनला.

# हार्दिक पंड्याने प्रथमच वनडे मालिकेत २०० पेक्षा जास्त धावा केल्या आहेत. त्याने ४ सामन्यात २२२ धावा केल्या आहेत.

# हार्दिक पंड्याने या मालिकेत १२ षटकार खेचले आहेत.

# डेविड वॉर्नरने १०० वनडेत १४ शतके केली आहेत. कालचे त्याचे शतक भारताविरुद्धचे दुसरे शतक होते.

# वॉर्नरला काल मिळालेला सामनावीर पुरस्कार हा त्याच्या वनडे कारकिर्दीतील १३ वा तर भारताविरुद्ध दुसरा सामनावीर पुरस्कार होता.

# वॉर्नरच्या १४ वनडे शतकांपैकी १० वेळा ऑस्ट्रेलियाने विजय मिळवला आहे.

# केदार जाधवने ३ वनडेत ऑस्ट्रेलियाविरुद्ध प्रथमच अर्धशतक केले आहे.